Ragpicker Injured in Blast : मध्य कोलकातामध्ये कचराच्या ढिगाऱ्यात असलेल्या एका स्फोटक वस्तूचा स्फोट झाला आहे. यामुळे कचरा वेचक जखमी झाल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. दुपारी १.४५ वाजता ही घटना घडली.

मध्य कोलकातामधील तालताळा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. स्फोटामुळे कचरावेचकाची अनेक बोटे उडून गेली आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, ब्लोचमन स्ट्रीटच्या एंट्री पॉईंटवर एक बारीक पिशवी सापडली आहे. हा परिसर सील केला असून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. बॉम्बशोधक पथकाने बॅग तपासली आणि आजूबाजूचा परिसर शोधला, त्यानंतर त्यांनी हा परिसर वाहतुकीसाठी मोकळा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कचरावेचकाचे नाव बापी दास (वय ४८) असे आहे. त्याने पोलिसांना सांगितले की तो परिसरात फिरत असे आणि अलीकडेच तो एसएन बॅनर्जी रोडवरील फुटपाथवर झोपू लागला. त्याच्यावर उपचार सुरू असल्याने त्याचा जबाब नोंदवणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर परिसराची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल.