नवी दिल्ली: ‘आम्ही अद्याप कोणताही पर्याय सुचवलेला नाही. देशातील ९० टक्के लोकांवर किती अन्याय झाला हे शोधले पाहिजे. त्यासाठी ‘एक्स-रे’ काढला पाहिजे. त्याद्वारे समस्या किती गंभीर आहे हे समजू शकेल एवढेच मी म्हणालो होतो’, असे स्पष्ट करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘संपत्तीच्या फेरवाटपा’च्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

जातगणना हा क्रांतिकारी उपाय असून स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर देश कुठे उभा आहे, इथून पुढे कोणती दिशा द्यायची याचे मूल्यमापन करणे अत्यंत गरजेचे आहे. पण, स्वत:ला ‘देशभक्त’ समजणारे जातगणना करू असे म्हणताच भयग्रस्त झाले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
issue of air and noise pollution increase in Thane during Diwali
ठाण्यात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदुषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
sugar workers salary
कोल्हापूर: पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू

दिल्लीतील जवाहर भवनमध्ये बुधवारी काँग्रेसने आयोजित केलेल्या सामाजिक न्याय संमेलनातील भाषणात राहुल गांधींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून होणाऱ्या वादावर भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जातगणनेला राहुल गांधी यांनी ‘एक्स-रे’ असे म्हटले आहे. हैदराबादमध्ये ७ एप्रिल रोजी झालेल्या भाषणामध्ये वित्तीय व संस्थात्मक सर्वेक्षण केले जाईल, असेही राहुल गांधींनी सांगितले होते.

हेही वाचा >>> Amit Shah Investment: अमित शाह यांच्याकडे कुठल्या कंपनीचे किती शेअर्स आहेत माहीत आहे?

‘एक्स-रे’ हा समस्या ओळखण्याचा मार्ग असून त्याला कोणाचा आक्षेप असेल असे वाटत नाही. मागास, दलित, आदिवासी व अल्पसंख्याक यांची एकत्रित संख्या देशाच्या लोकसंख्येच्या ९० टक्के होते. हे समाज ९० टक्के असूनही विविध क्षेत्रांमध्ये व संस्थांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व शून्य किंवा अगदीच नगण्य आहे. या ९० टक्क्यांवर अन्याय झाला असून त्याची तीव्रता तपासली पाहिजे असे मी म्हणालो तर पंतप्रधान मोदी आणि भाजप माझ्यावर समाजांमध्ये फूट पाडण्याचा आरोप करत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

तुम्हाला महासत्ता बनवायचे असेल, तुम्हाला चीनसारख्या देशांशी स्पर्धा करायची असेल, तर देशातील ९० टक्के लोकसंख्येला जोडल्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही.. जात जनगणना होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माझ्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही, तर माझ्या जीवनाचे ध्येय आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा >>> EVM वरुन सर्वोच्च न्यायालयात चर्चा, निर्णय ठेवला राखून, मात्र उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक २२ उद्योजकांना दिलेल्या १६ लाख कोटी रुपयांमधील अल्प रक्कम देशातील ९० टक्के लोकांना परत करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. आम्ही सर्वच्या सर्व १६ लाख कोटी परत करू असे आम्ही म्हणत नाही. त्यातील थोडे पैसे परत केले जातील, अशी टिप्पणी राहुल गांधींनी केली.  

राहुल गांधींनी नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनाला आदिवासी समाजातून आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण न दिल्याचा पुनरुच्चार केला. अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनप्रसंगी कोणताही दलित, मागास किंवा आदिवासी दिसला नाही याकडेही राहुल गांधींनी लक्ष वेधले.

निवडणूक हातून निसटल्याने मोदी घाबरले

सोलापूर : देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे. परंतु देशातील जनता आता मोदींना पुरती ओळखली आहे. म्हणूनच मोदी घाबरले आहेत. लोकसभा निवडणूक त्यांच्या हातातून निसटत आहे. म्हणूनच ते पुन्हा पाकिस्तान, दोन समाजामधील द्वेषाची, खोटेपणाची भाषा वापरत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सोलापुरात आयोजित जाहीर सभेत गांधी बोलत होते.

मोदींनी मूठभरांना अब्जाधीश केले, आम्ही कोटय़वधींना लखपती करू!

अमरावती : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी मूठभरांना अब्जोपती केले. पण, आम्ही सत्तेत येताच आम्ही कोटय़वधींना लखपती करू, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ बुधवारी परतवाडा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, गरीब महिलांसाठी महालक्ष्मी योजनेतून त्यांच्या बँक खात्यात वर्षांला एक लाख रुपये, बेरोजगार युवकांसाठी वर्षभरात एक लाख रुपये मिळवून देणारा शिकाऊ उमेदवारी कायदा आम्ही आणू. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शेतकरी आयोग स्थापन केला जाईल, या क्रांतीकारी निर्णयामुळे देशाचा चेहरामोहरा बदलून जाईल. नरेंद्र मोदी यांनी २०-२५ लोकांसाठी नोटाबंदी, जीएसटी लागू केले. त्यांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. या पैशातून २५ वर्षे मनरेगाचा खर्च भागवला जाऊ शकतो. त्यांनी २०-२५ अरबपती तयार केले, आम्ही अशा क्रांतिकारी योजना आणू की ज्यामुळे कोटय़वधी लोक लखपती बनतील. प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दर महिन्याला ८ हजार ५०० रुपये म्हणजे वर्षांला १ लाख रुपये जमा होतील. आशा, अंगणवाडी सेविकांचे उत्पन्न दुप्पट केले जाणार आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.