करोना महामारीच्या काळात कॉंग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सतत टीकेचे बाण सोडतं आहेत. आज आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी नाव न घेता मोदी सरकारला टोला लगावला.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर हॅशटॅगसह लिहिले की, “हा योगा दिन आहे, योगा दिवसाच्या नावाखाली लपण्याचा दिवस नव्हे.” यापुर्वी देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी ट्वीट केले होते की, “जीवनाची किंमत देणे अशक्य आहे – सरकारी नुकसानभरपाई ही एक छोटीशी मदत आहे परंतु मोदी सरकार हे करण्यासही तयार नाही. करोना काळात आधी उपचाराचा अभाव, नंतर खोट्या आकडेवारी आणि सरकारची क्रूरता!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नरेंद्र मोदींनी योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना केले संबोधित

योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी करोना संकटात योगाचं महत्व सांगितलं. योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

“आज जेव्हा संपूर्ण जग करोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योगा दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. करोना असतानाही योगा दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.