scorecardresearch

Premium

“संविधान सभेला येऊ शकणार नाही, पण…”, राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना पत्र

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आयोजित करण्यात आलेलया संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवलं होतं.

prakash ambedkar rahul gandhi
वंचित बहुजन आघाडीने मुंबईत संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं आहे. (PC : PTI)

वंचित बहुजन आघाडीने शनिवारी (२५ नोव्हेंबर) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (दादर) संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं आहे. उद्या देशभरात संविधान दिन साजरा केला जाणार आहे. या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वंचितने ही महासभा बोलावली आहे. वंचितने या सभेसाठी देशातील अनेक विरोधी पक्षांना आणि नेत्यांना या सभेचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेत देशाचं संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय आणि सद्यस्थिती यावर चर्चा केली जाईल. या सभेतून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देशातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारवर आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी या सभेसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनादेखील निमंत्रण दिलं आहे. राहुल गांधी या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. परंतु, त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून या सभेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Sharad Pawar group protest
शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे धरणे आंदोलन
pm narendra modi appeal to bjp workers to keep 370 seats target in lok sabha poll
कमळाचे फूल हाच उमेदवार; पंतप्रधानांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन; लोकसभेसाठी ३७० जागांचे लक्ष्य
chhagan bhujbal ajit pawar cm maharashtra formula
छगन भुजबळ म्हणाले, ‘अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी…’
Narendra Modi criticizes Pandit Nehru on reservation
नेहरू आरक्षणविरोधी! पंतप्रधानांचे टीकास्त्र, काँग्रेसवरही आरोपांच्या फैरी 

राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, संविधान सन्मान महासभेचं निमंत्रण दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. तसेच संविधान दिनानिमित्त तुम्ही ही महासभा आयोजित केल्याबद्दल तुमचं आणि वंचित बहुजन आघाडीचं अभिनंदन करू इच्छितो. आपण आज एका गभीर परिस्थितीता सामना करत आहोत. आपण गेल्या नऊ वर्षांमध्ये आपल्या घटनात्मक मूल्यांवर हल्ला होताना पाहिलं आहे. आपल्या बलाढ्या देशाचा पाया रचणाऱ्यांच्या विचारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याची आता नितांत गरज आहे.

राहुल गांधी हे सध्या तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या कामांत व्यस्त आहेत. त्यामुळे ते मुंबईत संविधान सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, दुर्दैवाने माझ्या चालू असलेल्या मोहिमेमुळे मी या सभेला उपस्थित राहू शकणार नाही. मी वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि तुमच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना शुभेच्छा देतो.

हे ही वाचा >> “पंतप्रधान मोदी आधी इस्रायलबरोबर होते, आता…”, संजय राऊतांचा टोला; ज्यूंबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण देत म्हणाले…

प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण देताना काय म्हटलं होतं?

सध्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा मिळून संविधानिक मूल्ये आणि आदर्श नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याशी लढण्याच्या आपल्या दोघांच्या वचनबद्धतेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारावरून, वंचित बहुजन आघाडी या आमच्या पक्षाच्या वतीने मी तुम्हाला संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण देतो, या निमित्ताने तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांना संबोधित करण्याची आणि भारताच्या भविष्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन तथा भूमिका मांडण्याची संधी मिळेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul gandhi letter to prakash ambedkar over invitation for samvidhan samman mahasabha asc

First published on: 25-11-2023 at 15:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×