काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पँगोंग तलावावर चीनकडून बांधण्यात येत असलेल्या पुलावरून सरकारवर सडकून टीका केली आहे. राहुल गांधींनी चीन आपल्या देशात राजनैतिक पूल बांधत असल्याचे म्हटले आहे. पीएम मोदींच्या मौनामुळे चीनची हिम्मत वाढली आहे. आता तर अशी भीती वाटतीये की, या पुलाच्या उद्घाटनासाठी मोदी स्वतः तर पोहोचणार नाहीत, ना, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींना टोला लगावला आहे. लडाखमधील पॅंगॉन्ग तलावावर चीनकडून पूल बांधण्याचे प्रकरण तापले आहे. याआधी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वतःच्याच सरकारवर टीका केली होती.

“चीन आपल्या देशात राजनैतिक पूल बांधत आहे. आपल्या पंतप्रधानांच्या मौनामुळे चीनची हिम्मत वाढत आहे. आता तर अशी भीती वाटतीये की, या पुलाच्या उद्घाटनासाठी मोदी स्वतः तर पोहोचणार नाहीत ना,” असं  राहुल गांधींनी म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर काही लोकांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचे समर्थन केले. एका युजरने म्हटलं की, चीनने देशाच्या सीमेवर पूल बांधावे किंवा घरे बांधावीत, पण मोदींचे भाषण चांगले असायला पाहिजे. सबका साथ, सबका विकास म्हणतात पण सगळं सत्यानाश केलंय, असं म्हणत नेटकऱ्यांनी टीका केली. तर काही युजर्सनी राहुल गांधींवर टीका केली आहे.