भूमी अधिग्रहण विधेयक आणि नेट न्युट्रॅलिटीवरून धारदार टीका करीत संसदेत नरेंद्र मोदी सरकारची कोंडी करणारे काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी हे आता केदारनाथ यात्रेला जाणार आहेत. ते गुरुवारी उत्तराखंडला पोहोचले असून येथून १६ किमीचे अंतर पायी कापत ते केदारनाथाचे दर्शन घेणार आहेत.
केदारनाथ यात्रा २४ एप्रिलपासून सुरू होत आहे. राहुल गांधी हे दुपारी येथे पोहोचले असून रात्रीपर्यंत १० किमीची पायपीट करून लिंचोली गाठून व तेथे मुक्काम करून शुक्रवारी सहा किमी चालून ते केदारनाथ मंदिरात पहाटे सहापर्यंत पोहोचणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi takes trek to kedarnath shrine
First published on: 24-04-2015 at 05:49 IST