Sonam Raghuvanshi On Raja Raghuvanshi Murder: मेघालयात हनिमूनसाठी गेले असताना पती राजा रघुवंशीची हत्या केल्याच्या आरोपाखाली सोनम रघुवंशीला तिच्या अटक करण्यात आली आहे. २३ मे रोजी हे जोडपे बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जून रोजी पती राजाचा मृतदेह दरीत सापडला, तर सोनमचा शोध सुरूच होता. यानंतर बेपत्ता असलेल्या सोनमने उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती उघड झाली.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अमिताभ यश यांनी या प्रकरणाबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सोनमने दावा केला आहे की, “तिला ड्रग्ज देऊन गाझीपूरला आणण्यात आले होते”.

एनडीटीव्हीशी बोलताना अमिताभ यश म्हणाले की, “सोनमने पोलिसांसमोर स्वतःला पीडित म्हणून सादर केले आणि दावा केला की तिला ड्रग्ज देऊन गाझीपूरला आणण्यात आले होते. पोलीस आपल्याला शोधून काढतील या भीतीने तिने तिच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली. सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तिने तिच्या कुटुंबियांना सांगितले की ती गाझीपूर-वाराणसी रस्त्यावरील एका ढाब्यावर आहे. तिच्या कुटुंबाने ताबडतोब मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला, ज्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर सोनमला अटक करण्यात आली.”

सोनमला पोलिसांनी अटक केल्यानंतर २३ मे पासून सुरू असलेला हा तपास झांपला आणि या प्रकरणाला नवे वळन मिळाले. कारण मेघालय पोलिसांच्या मते आरोपी सोनमचे विवाहबाह्य संबंध होते ज्यामुळे राजाची हत्या झाली. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहा याच्याशी संगनमत करून ही हत्या घडवून आणली आणि दबावाखाली ८ जून रोजी आत्मसमर्पण केले.

याबाबात अधिक बोलताना अमिताभ यश म्हणाले की, “सोनम एक वाईट प्लॅनर आहे. तिला पोलिसांच्या कार्यपद्धतींचे ज्ञान नाही. म्हणून तिला वाटले की ती पीडित असल्याचे भासवून यातून सुटू शकते, परंतु तिचा डाव फसला. मेघालय पोलिसांनी उत्कृष्ट काम केले आहे आणि सध्या ते केस हाताळत आहेत. जर त्यांनी काही मदत लागली तर त्यासाठी आम्ही तयार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मेघालय पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करत असल्यामुळे यामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांचा सहभाग नाही. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणातील मुख्य संशयित असलेली महिला एकटीच गाझीपूरला आली होती, “त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.”