राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका कार्यक्रमात बोलताना अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. ”आजकाल वादविवाद होत नाहीत, कोणाला बोलू दिले जात नाही. युपीएच्या काळात अण्णा हजारे यांनी दहशत निर्माण केली होती. मात्र, आता ते स्वतःच गायब झालेत, असं ते म्हणाले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका कार्यक्रमात बोलताना अण्णा हजार यांच्यावर टीका केली आहे. ”यूपीए सरकारची बदनामी करण्यासाठी अण्णा हजारे यांनी त्यावेळी दहशत निर्माण केली होती. मात्र, आता ते स्वतःच गायब झाले आहेत. ते कुठे गेले तेच कळत नाही. आता देशात लोकपालाची चर्चा होत नाही. कोलगेट, टूजी हे सर्व मुद्द्यांवर आता चर्चा बंद झाली आहे.” असे ते म्हणाले.

हेही वाचा – Shinde vs Thackeray: ‘न्यायालयाने ढवळाढवळ करु नये’ या युक्तीवादावरुन सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, “तुम्ही न्यायालयात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्यांनी अग्निपथ योजना आणि संसदेच्या कामकाजावरूनही केंद्र सरकारवर टीकास्र सोडले. ते म्हणाले “आजकाल देशात वादविवाद होत नाहीत, कोणाला बोलू दिले जात नाही. ‘अग्निपथ’ हा या वर्षातील सर्वात मोठा विनोद असेल. चार वर्षांच्या सेवेनंतर तरुणांना घरी बसवलं जाईल. आर्मीचे जवान २४ वर्षांचे असतानाच निवृत्त होतील. कळस म्हणजे आंदोलन केल्यास अग्निवीरमध्ये नोकरी देणार नाही, अशी वेगळी धमकी दिली जात आहे.”