Man’s Body Found Rotting In A Drum : देशातील विविध शहरांत दररोज अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याच्या बातम्या समोर येतात. घरगुती हिंसाचार, मारहाण, दरोडे किंवा कधी किरकोळ वादातून थेट खून झाल्याच्याही घटना घडतात. मात्र, आता राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका पुरूषाचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरलेल्या अवस्थेत घराच्या छतावर आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं घटना काय घडली?
राजस्थानच्या खैरथल-तिजारा जिल्ह्यातील एका घराच्या छतावर ड्रममध्ये भरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. एका ८ वर्षांच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर ही घडना उघडकीस आली असून खैरथल-तिजारा जिल्ह्यातील जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, मुलाने सांगितलं की, त्याची आई आणि आईचा कथित प्रियकराला वडिलांचा मृतदेह प्लास्टिकच्या एका निळ्या ड्रममध्ये छतावर लपवताना त्याने पाहिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाची आई सुनीता आणि तिचा कथित प्रियकर जितेंद्र याला ताब्यात घेतलं आहे. त्या दोघांवर तिच्या पतीची हत्या करून मुतदेह लपवल्याचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील रहिवासी असलेल्या हंसरामचा मृतदेह रविवारी किशनगड बास येथील एका घराच्या छतावर ड्रममध्ये भरलेला आढळला. हंसराम सुमारे दोन महिन्यांपासून किशनगड बास येथे भाड्याच्या खोलीत त्याची पत्नी आणि तीन मुलांसह राहत होता. तसेच तो तेथील एका स्थानिक वीटभट्टीवर काम करत होता. मात्र, रविवारी शेजाऱ्यांनी छतावरून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली आणि त्यानंतर हंसरामचा मृतदेह छतावरील एका ड्रममध्ये सापडला.
नीला ड्रम रिटर्न,पति की हत्या कर मकान मालिक के बेटे संग फरार 3 बच्चों की मां, गिरफ्तारी के बाद खुला खौफनाक राज, राजस्थान के खैरथल तिजारा जिले की घटना।
— Anwar Ali (@Anwarali_0A) August 19, 2025
पति-पत्नी का रिश्ता भरोसे और सम्मान पर टिका होता है। अगर कभी हालात ऐसे बन जाएँ कि साथ रहना मुश्किल हो जाए, तो कानूनी रास्ता… pic.twitter.com/GKpkjTocGf
प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, मृतदेहावर मीठ लावण्यात आलं होतं. ज्यामुळे मृतदेहाचं कुजण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता होती. तसेच ही हत्या केल्यानंतर त्या महिलेने तिच्या प्रियकरासह आपल्या तीन मुलांना दुसऱ्या एका वीटभट्टीवर लपवलं होतं. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत तिच्या एका ८ वर्षांच्या मुलाने पोलिसांना घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केलं आहे.