भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळावे म्हणून जगभरातून अनेक संस्थानी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. भारतात सुरू असलेल्या आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने या संकटकाळात फाऊंडेशनच्या माध्यमातून ७.५ कोटी निधी जमा केला आहे. हा निधी करोना रिलिफ फंडला देण्याचे त्यांनी जाहीर केले.

 

सर्व देशभर पसरलेल्या करोना महामारीमुळे पीडितांना तातडीने मदत मिळावी म्हणून हा निधी जमा केल्याचे राजस्थान संघाने गुरुवारी सांगितले. भारतात करोनाचा संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून बुधवारी देशात संक्रमणाची ३ लाख ७९ हजार २५७ प्रकरणे समोर आली आहेत. देशातील संक्रमणाची एकूण संख्या एक कोटी ८३ लाख ७६ हजारांवर पोहोचली आहे.

“संघ मालकांनी आणि संघ व्यवस्थापनाने खेळाडूंसोबत निधी गोळा केला आहे आणि राजस्थान रॉयल्स फाऊंडेशन (आरआरएफ) आणि ब्रिटीश एशियन ट्रस्ट (बीएटी) च्या कल्याणकारी संस्थांसमवेत संघ कार्यरत आहे,” असे फ्रेंचायझीने सांगितले.

पॅट कमिन्स आणि ब्रेट लीची भारताला मदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्सने भारतातील करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ३७ लाखांची मदत केली. कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने मदतीचा हात पुढे केला. लीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. कमिन्सने या कठीण काळात भारताला मदत करण्याची विनंती त्याच्या सहकाऱ्यांना केली होती. या आवाहनानंतर लीने भारताला मदत केली आहे.