scorecardresearch

Premium

“मला तर वाटलं होतं ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव देखील…”, काँग्रेस नेत्याची खोचक प्रतिक्रिया!

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवण्याच्या निर्णयावर काँग्रेसकडून खोचक टीका केली जात आहे.

congress on major dhyanchand khel ratna award pm narendra modi
कांग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!

देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कान असं करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिलेली असतानाच दुसरीकडे काँग्रेसकडून यावर आक्षेप घेतला जात आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून खोचक टीका केली आहे. तसेच, यालाच इंग्रजीमध्ये Meglomania असं म्हणतात, असं देखील त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मोदींच्या निर्णयावर आश्चर्य!

दिग्विजय सिंह यांनी यासंदर्भात ट्वीटमध्ये मोदींच्या या घोषणेवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. “आधी आहमदाबादच्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं. मला आश्चर्य वाटलं, जेव्हा त्यांनी मेजर ध्यानचंद जीच्या नावे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव ठेवलं”, असं दिग्विजय सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

 

मला वाटलं होतं की…

दरम्यान, या ट्वीटमध्ये दिग्विजय सिंह यांनी मोदींना खोचक टोला देखील लगावला आहे. “मला तर वाटलं होतं की ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव देखील बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठेवतील. यालाच इंग्रजीमध्ये Megalomania म्हणतात!” असं देखील दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. आपण सर्वश्रेष्ठ असल्याची भावना मनात निर्माण होणे, याला मेगलोमॅनिया म्हणतात.

 

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्याची विनंती देशभरातून येत होती. नागरिकांच्या या विनंतीनंतर हे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेसकडून आक्षेप घेतला जात आहे.

 

“देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचं नाव देणंच योग्य आहे” असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajiv gandhi khel ratna award renamed as major dhyanchand khelratna award congress leader digvijay singh tweet pmw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×