माजी केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी पुन्हा एकदा स्वतः विमान चालवत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. राजीव प्रताप रुडी हे व्यावसायिक पायलट आहेत. पोर्ट ब्लेअर येथील पर्यटनावरील संसदीय अभ्यास दौरा संपल्यानंतर बेंगळुरूमार्गे मुंबईला येत असताना खासदार संभाजीराजे भोसले हे ज्या विमानाने प्रवास करत होते त्याचे वैमानिक माजी केंद्रीय मंत्री श्री राजीव प्रताप रुडी होते.

संभाजीराजेंनी रुढींसोबतचा फोटो ट्विट करत ही माहिती माहिती दिली आहे. पोर्ट ब्लेअर येथील पर्यटनावरील आमचा संसदीय अभ्यास दौरा संपल्यानंतर मी बेंगळुरूमार्गे मुंबईला जात आहे.  आमचे बेंगळुरूचे विमान इतर कोणीही नाही तर माझे संसदीय सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री श्री राजीव प्रताप रुडी यांनी चालवले आहे. ते आमच्या शिष्टमंडळाचा एक भाग होते आणि आता ते आमचे चांगला मित्र आणि सहकारी, आमचे पायलट असल्यामुळे एक वेगळाच आनंद आहे, असे संभाजीराजेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे आणि संभाजीराजेंचे मित्र केविन अँटो अँथनी देखील उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कोलकाता येथून बिहारच्या दरभंगा विमानतळावर आलेल्या पहिल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे फ्लाइट क्रू कॅप्टन, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि सारण लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजीव प्रताप रुडी होते. खासदार राजीव प्रताप रुडी हे परवानाधारक व्यावसायिक पायलट आहेत. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी राफेल आणि सुखोई आदी लढाऊ विमाने यशस्वीपणे उडवली आहेत. जगातील पहिले खासदार पायलट म्हणून रुडींचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.