scorecardresearch

राजौरी दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ बंद

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ पूंछ जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला.

राजौरी दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ बंद
राजौरी दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ बंद

पीटीआय, जम्मू

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ पूंछ जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या, तर जम्मूमध्ये नागरिकांकडून आंदोलने करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहा जण ठार, तर ११ जण जखमी झाले.

या बंदच्या पाश्र्वभूमीवर पूंछ आणि राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. कडाक्याच्या थंडीतही जिल्ह्यातील शेकडो नागरिक आंदोलनासाठी बाहेर पडल्याने दुकाने आणि बाजारपेठा बंद होत्या. आंदोलकांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देत टायर जाळले. कठुआमध्ये आंदोलकांनी कालीबारी येथे महामार्गावर जमून रस्ता रोखून धरला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक एक तास विस्कळीत झाली.

स्थानिक भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमध्ये समस्या निर्माण केल्याबद्दल पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. ‘‘आम्ही हत्येच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा काढला. जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत. सरकारने लोकांच्या सुरक्षेची खात्री दिली पाहिजे,’’ असे जम्मूमध्ये आंदोलकाने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 02:53 IST

संबंधित बातम्या