Raksha Bandhan 2023 Date and Shuba Muhurat :श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधनच्या मुहूर्तामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. हिंदू पंचांगानुसार ३० ऑगस्टला सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी भद्रा नक्षत्र भूलोकी आहे. तो रात्री नऊपर्यंत राहणार आहे. त्यामुळे भावाला राखी नेमकी केव्हा बांधावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागरिकांचा हा संभ्रम राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दूर केला आहे. त्यांनी रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त सांगितला आहे.

रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, “रक्षाबंधन रात्री ८ वाजून ४ मिनिटांनी प्रारंभ होणार आहे. तर, ११.३६ मिनिटांनी पूर्ण होणार आहे. त्यामुळे या काळात राखी बांधणे योग्य आहे.”

तारखांबाबातही झाला होता घोळ

पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यावेळी ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाल नक्षत्र आहे. द्रिक पंचांगानुसार, ३० ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ०१ मिनिटापर्यंत भाद्र पौर्णिमा असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान श्रावण पौर्णिमा तिथी ही मुळात ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०: ५८ वाजता सुरू होते आणि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७:०५ वाजता समाप्त होते. यामुळेच रक्षाबंधनाच्या तारखांबाबत संभ्रम निर्माण झाला होता पण वरील माहितीनुसार रक्षाबंधन हे ३० ऑगस्टलाच असणार आहे.