आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिध्द असलेले भाजप नेते राम जेठमलानी यांनी स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ‘प्रभू रामचंद्र हे पती म्हणून वाईट होते आणि मला ते अजिबात आवडत नाहीत, असे सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
रामाची ख्याची ते ‘एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी’, होते अशी आहे. मात्र, ते पती म्हणून वाईट असल्याचा जावईशोध ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी नवी दिल्लीत गुरूवारी एका पुस्तक प्रकाशन समारंभात लावला.
एवढंच नव्हे तर, त्यांनी आपल्या पत्नीला वनवासात पाठवलं. लक्ष्मण तर त्याहून वाईट होता. सीतेला रावणानं पळवून नेल्यावर रामाने तिला शोधण्यासाठी आपला बंधू लक्ष्मणाला पाठवलं. अख्यायिकेनुसार लक्ष्मणानं कधीच आपल्या वहिनीच्या चेहऱ्याकडे पाहिलं नव्हतं. मग लक्ष्मण तिला कसा ओळखणार होता?” असं जेठमलानी म्हणाले. यानंतर उपस्थितांनी हसून या वाक्यांना दादही दिली.
दरम्यान, भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी एका हिंदी चित्रपटाचील ‘राधा’ या शब्दाच्या उपयोगाबद्दल आपेक्ष घेतला असून, हा विषय संसदेत मांडणार असल्याचंही जाहीर केल होतं.
भाजपने गेली अनेक वर्षे राममंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र, राम जेठमलानींनी केलेल्या या विधानानंतर भाजपची चांगलीच गोची झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Nov 2012 रोजी प्रकाशित
प्रभू रामचंद्र पती म्हणून वाईट – जेठमलानी
भाजप नेते राम जेठमलानी यांनी स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात 'प्रभू रामचंद्र हे पती म्हणून वाईट होते आणि मला ते अजिबात आवडत नाहीत, असे सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

First published on: 09-11-2012 at 12:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram was a bad husband