ईटी नाऊचा अँकर वरुण हिरेमठवर बलात्काराचा आरोप करणार्‍या २२ वर्षीय महिलेने मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे यांना एक पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या असंवेदनशील, अनुचित आणि क्लेशकारक वागण्याबद्दल महिलेने त्यांचे लक्ष वेधले आहे.
हिरेमठवर या महिलेने बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि आपल्याला कैद करून ठेवल्याचा आरोप केला आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात हा खटला दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हिरेमठ फरार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११ मार्च २०२१ रोजीच्या एका पत्रात महिलेने १० मार्च २०२१ रोजी पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन सुनावणीचा संदर्भ दिला आहे. सुनावणीदरम्यान, तिने सांगितले की आरोपीच्या वकिलाने वारंवार तिच्याशी अभद्र व्यवहार केला तसेच बऱ्याच गोष्टींवर विनोद केले – आणि या अनादर व संवेदनशील वागण्यावर आक्षेप घेण्याऐवजी न्यायाधीश संजय खानगवाल हसत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape complainant writes to cji to complaint against session court judge for insensitive behavior sbi
First published on: 30-03-2021 at 13:35 IST