राष्ट्रपती भवनातील कर्मचारी वसतिगृहातील एका खोलीत गुरुवारी रात्री मृतदेह सापडला. वसतिगृहातील एका खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर लगेचच शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तिथे एका पुरुषाचा मृतदेह सापडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्रिलोकचंद असे त्याचे नाव आहे. राष्ट्रपती भवनातील सचिवालयात तो काम करत होता. मागच्या काही दिवसांपासून त्रिलोकचंद आजारी होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. ह्दयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असावा असे पोलिसांचे मत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

चार ते पाच दिवसांपूर्वी त्रिलोकचंदचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला त्यावेळी तो अत्यंत वाईट स्थितीत होता. त्रिलोकचंदला पत्नी, एक मुलगा आणि वृद्ध आई आहे. त्रिलोकचंद गांधीनगर येथे राहायला होता. शेजाऱ्यांना वाटले कि, तो पुन्हा गांधीनगरला निघून गेला. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास त्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrapati bhavan in lock room body found
First published on: 08-06-2018 at 15:00 IST