भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या मोठया बहिणीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महिन्याभरापूर्वी रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबाने भाजपामध्ये प्रवेश केला होता. नैनाबा जडेजाने काँग्रेसची निवड केली आहे. भाजपा शेतकरी, महिला आणि युवकांना दिलेला शब्द पाळत नाही. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षाची निवड केली असे नैनाबाने सांगितले.

मोदींच्या जामनगर दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ३ मार्च रोजी रीवाबा सोलंकीने भाजपामध्ये प्रवेश केला होता. करणी सेनेच्या महिला विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर पाच महिन्यांनी रीवाबाने राजकीय पक्षाच प्रवेश केला होता. पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात करणी सेनेने मोठे आंदोलन केले होते.

समाजासाठी काही चांगलं करण्याच्या उद्देशाने भाजपामध्ये प्रवेश केल्याचे रीवाबाने सांगितले होते. रीवाबाने दिल्लीमधून अभियंत्रिकेचे शिक्षण घेतले आहे. १७ एप्रिल २०१६ रोजी रीवाबा आणि रविंद्र जडेजा यांनी विवाहबंधनात अडकले होते. जून २०१७ रोजी त्यांना कन्यरत्न झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्योगपती आणि कंत्राटदार हरदेव सिंह सोळंकी यांची रिवाबा ही एकुलती एक मुलगी असून त्यांच्या स्वत:च्या २ खासगी शाळा आणि एक हॉटेल आहे. त्याचबरोबर रिवाबाचे काका हरिसिंह सोळंकी हे गुजरातमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. रिवाबाची आई प्रफुलब्बा राजकोट येथे रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.