आरबीआयने इंडियन ओव्हरसीज बँकेला ‘प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन (पीसीए)’ अर्थात तत्पर सुधारात्मक आकृतिबंधातून बाहेर करत दिलासा दिला आहे. पीसीएमुळे बँकांना कर्ज देणे, व्यवस्थापन भरपाई आणि संचालकांना पैसे देण्यावर बंधनं असतात. मात्र आता पीएसीतून दिलासा दिल्याने बँक आपला दैनंदिन व्यवहार करू शकणार आहे. आरबीआयने ऑक्टोबर २०१५ मध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेवर निर्बंध लादले होते. यापूर्वी यूको बँकेला पीसीएतून दिलासा दिला होता. हा निर्णय या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेतला होता. “आर्थिक पर्यवेक्षण मंडळाने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. ३१ मार्च २०२१ रोजी जाहीर केलेल्या निकालानुसार बँकेने पीसीए पॅरामीटरचं उल्लंघन केले नाही. त्यामुळे बँकेला पीसीए चौकटीतून बाहेर केलं आहे”, असं आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

“इंडियन ओव्हरसीज बँकेनं लेखी म्हटलं आहे की, सर्व नियामांचं पालन केलं जाईल. रेग्युलेटरी कॅपिटल, नेट एनपीए आणि लेवरेज रेशियोवर लक्ष ठेवेल. इंडियन ओव्हरसीज बँकेने रिझर्व्ह बँकेला आश्वासन दिलं आहे की, हळूहळू संरचनात्मक आणि पद्धतशीर बदलांच्या दिशेन काम करेल”, असं आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडियन ओव्हरसीज बँक पीसीएतून बाहेर आल्याने ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँक आपल्या शाखांता विस्तार करू शकणार आहे. तसेच नविन भरती देखली सुरु होणार होतील. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.