सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली. या मंजुरीनंतरच अयोध्या हे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. लोक येथे जमीन खरेदी करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. भूखंड खरेदी करणाऱ्यांमध्ये स्थानिक आमदार, नोकरशहांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये स्थापन झालेल्या अधिकृत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आतापर्यंत जवळपास ७० एकर जमीन ताब्यात घेतली आहे, तर खाजगी खरेदीदार देखील प्रकल्पाला गती मिळताच मोठ्या नफ्याच्या अपेक्षेने या ठिकाणी धाव घेत आहेत. अधिकारीवर्गनेही पैसे कमावण्याची आशेने या जमिनींमध्ये गुंतवणूक केली आहे. या खरेदीदारांमध्ये स्थानिक आमदार, अयोध्येत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे जवळचे नातेवाईक आणि स्थानिक महसूल अधिकारी यांचा समावेश आहे ज्यांचे काम जमिनीच्या व्यवहारांचे प्रमाणीकरण करणे आहे, असे इंडियन एक्स्प्रेसने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे.
आमदार, महापौर आणि राज्य ओबीसी आयोगाच्या सदस्यापासून विभागीय आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस परिमंडळ अधिकारी, राज्य माहिती आयुक्त यांच्या नातेवाईकांनी स्वत:च्या नावावर जमीन खरेदी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने तपासलेल्या नोंदींमधून या अधिकार्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराच्या पाच किमीच्या परिसरात जमीन खरेदी केली आहे. यामध्ये १४ जणांनी भूखंड घेतल्याची प्रकरणे समोर आली आहेत
अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर अयोध्येचे स्वरूप बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत येथून जमीन खरेदी अनेकांनी रस दाखवला आहे. त्याचबरोबर जमीन खरेदीत कथित अनियमितता झाल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. विशेष म्हणजे पाच प्रकरणांमध्ये महर्षी रामायण विद्यापीठ ट्रस्ट (एमआरव्हीटी), दलित ग्रामस्थांकडून जमीन खरेदी केल्याचा तपास त्याच अधिकाऱ्यांकडून केला जात आहे ज्यांच्या नातेवाईकांनी जमीन खरेदी केली होती.
१. एम पी अग्रवाल, विभागीय आयुक्त, अयोध्या (नोव्हेंबर २०१९ पासून)
एम पी अग्रवाल यांचे सासरे केशव प्रसाद अग्रवाल यांनी १० डिसेंबर २०२० रोजी बरहाटा मांझा येथे २,५३० चौरस मीटर जागा महर्षी रामायण विद्यापीठ ट्रस्ट (एमआरव्हीटी) कडून ३१ लाख रुपयांना विकत घेतली. त्याचा मेहुणा आनंद वर्धन यांनी त्याच दिवशी त्याच गावात १,२६० चौरस मीटर जागा एमआरव्हीटी कडून १५.५० लाख रुपयांना विकत घेतली. विशेष म्हणजे, कंपनीच्या नोंदीवरून असे दिसून येते की आयुक्तांची पत्नी तिच्या वडिलांच्या फर्म, हेलमंड कॉन्ट्रॅक्टर्स अँड बिल्डर्स एलएलपीमध्ये भागीदार आहे.
यावर बोलताना एम पी अग्रवाल यांनी बोलणे टाळले. त्यांचे सासरे केशव प्रसाद अग्रवाल म्हणाले, “होय, मी ही जमीन खरेदी केली आहे कारण मी निवृत्तीनंतर अयोध्येत राहण्याचा विचार करत होतो. श्री एम पी अग्रवाल यांची यात कोणतीही भूमिका नाही.”
२. पुरुषोत्तम दास गुप्ता
२० जुलै २०१८ ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान पुरुषोत्तम दास गुप्ता अयोध्येचे मुख्य महसूल अधिकारी होते. आता ते गोरखपूरमध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (कार्यकारी) आहेत. त्यांचा मेहुणा अतुल गुप्ता यांची पत्नी तृप्ती गुप्ता यांनी अमर जीत यादव याच्यासोबत भागीदारीत १२ ऑक्टोबर २०२१ रोजी बरहाटा मांझा येथे ११.८८ लाख रुपयांना एमआरव्हीटी कडून १,१३० चौरस मीटर जागा खरेदी केली.
यावर बोलताना पुरुषोत्तम दास गुप्ता म्हणाले की एमआरव्हीटी विरुद्धच्या चौकशीत त्यांची कोणतीही भूमिका नाही आणि त्यांनी त्यांच्या नावावर कोणतीही जमीन खरेदी केलेली नाही. तरअतुल गुप्ता म्हणाले, “मी जमीन खरेदी केली कारण ती स्वस्त दरात उपलब्ध होती. मी (पुरुषोत्तमची) मदत घेतली नाही.”
३. इंद्र प्रताप तिवारी, आमदार, गोसाईगंज, अयोध्या जिल्हा
इंद्र प्रताप तिवारी यांनी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी बरहाटा मांझा येथे २,५९३ चौरस मीटर जमिन ट्रस्ट कडून ३० लाख रुपयांना विकत घेतली. १६ मार्च २०२१ रोजी, त्यांचे मेहुणे राजेश कुमार मिश्रा यांनी राघवाचार्यासह, सूरज दास यांच्याकडून बरहाटा मांझा येथे ६३२० चौरस मीटर ४७.४० लाख रुपयांना विकत घेतली.
यावर राजेश मिश्रा म्हणाले की, “मी माझ्या बचतीतून हे भूखंड खरेदी केले आहेत. माझा (आमदार) तिवारीजींशी काहीही संबंध नाही.
४. दीपक कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी)
दीपक कुमार यांची मेहुणी महिमा ठाकूर हिने १ सप्टेंबर २०२१ रोजी १,०२० चौरस मीटर बरहाटा मांझा येथे ट्रस्ट कडून १९.७५ लाख रुपयांना विकत घेतले.
यावर दीपक कुमार म्हणाले की, “माझ्या अयोध्येतील पोस्टिंगदरम्यान माझ्या नातेवाईकांपैकी कोणीही जमीन खरेदी केली नाही. मी, माझ्या पत्नीने किंवा माझ्या वडिलांनी तेथील कोणत्याही जमिनीसाठी पैसे दिले नाहीत. माझा सहकारी भाऊ (महिमा ठाकूरचा नवरा) कुशीनगरचा आहे आणि आता बेंगळुरूमध्ये राहतो. त्यांनी मला सांगितले की त्यांनी कुशीनगरमधील जमीन विकून अयोध्येत जमीन घेतली आहे. या खरेदीशी माझी कोणतीही भूमिका आणि संबंध नाही.”
५. आयुष चौधरी, माजी उपविभागीय दंडाधिकारी, अयोध्या
२८ मे २०२० रोजी चौधरी यांची चुलत बहीण शोभिता राणी हिने अयोध्येतील बिरौली येथे ५,३५० चौरस मीटर जागा आश्रमाकडून १७.६६ लाख रुपयांना विकत घेतली. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी, शोभिता राणी संचलित आरव दिशा कमला फाउंडेशनने अयोध्येतील मलिकपूर येथे दिनेश कुमार यांच्याकडून ७.२४ लाख रुपयांना १,१३० चौरस मीटर जागा खरेदी केली.
याबद्दल बोलताना आयुष चौधरीने सांगितले की त्यांचा राणी किंवा फाऊंडेशनशी कोणताही संबंध नाही, तर राणीचा पती रामजन्म वर्मा म्हणाला की “आयुष माझ्या पत्नीचा चुलत भाऊ आहे, आम्ही फाउंडेशनची स्थापना केली आहे.”
दरम्यान, आणखी ११ उच्च पदावरील अधिकारी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी हे जमिनींचे व्यवहार अयोध्या निकाला नंतर केले आहेत.