पीटीआय, उत्तरकाशी

आठवडय़ानंतरही कोसळलेल्या बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांच्या  बचावकार्याला यश येत नसल्याने  त्यांचे नातलग चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. तर बोगद्यात अडकलेल्या मजुरांची संख्या ४० नाही तर ४१ असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. दरम्यान, बोगद्यातील कोसळलेला ढिगारा फोडून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी मार्ग तयार करण्याचे शुक्रवारपासून ठप्प झालेले बचावकार्य शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आले.  इंदूरहून मागवलेल्या उच्च क्षमतेच्या खोदकाम यंत्राद्वारे आता बोगद्याच्या वरच्या बाजूने लंबाकृती खोदकाम सुरू करण्यात आले आहे.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव

बोगद्यातील ढिगारा भेदण्यासाठी एक ‘अमेरिकन ऑगर मशीन’ दिल्लीहून सिल्क्यारा येथे आणण्यात आले होते. त्याद्वारे शुक्रवारी दुपापर्यंत २२ मीटर खोदकाम करून सहा मीटर लांबीचे चार पाइप बसवण्यात आले होते. पाचवा पाइप बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी बोगद्यातून प्रचंड आवाज आला. त्यामुळे बचाव पथकांमध्ये घबराट पसरली आणि बचावकार्य तातडीने थांबवण्यात आले. या प्रकल्पाशी संबंधित एका तज्ज्ञानेही या भागात काही ठिकाणी दरड कोसळल्याचे सांगितले. बोगद्यात  ढिगारा साचला आहे.  ढिगाऱ्यात खोदकामाद्वारे पोलादी पाइप टाकून सुटकेचा मार्ग तयार करून कामगारांना बाहेर काढण्याची योजना दुसऱ्यांदा ठप्प झाली होती.

हेही वाचा >>>उत्तराखंडमध्ये मजुरांचे बचावकार्य ठप्प; बोगद्यात ४१ कामगार अडकल्याचे स्पष्ट

कामगारांचा आवाज क्षीण होतोय..

त्यांचा आवाज क्षीण होत आहे, असे कामगारांच्या नातेवाईकांनी सांगितले. बोगद्यातील अंधारात कामगारांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत, असे अडकलेल्या एका कामगाराचा भाऊ हरिद्वार शर्मा यांनी सांगितले. प्रशासनाकडून फक्त आश्वासने मिळत आहेत. कंपनी आणि सरकार यापैकी कुणीही काहीही करीत नाही, अशी तक्रारही त्यांनी केली.