पीटीआय, उत्तरकाशी

सिल्क्यारा बोगद्यातील कोसळलेला ढिगारा फोडून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी मार्ग तयार करण्याचे काम शुक्रवारपासून ठप्प झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. तर या बोगद्यात अडकलेल्या मजुरांची संख्या ४० ऐवजी ४१ असल्याची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली. बचावकार्यातील अडथळय़ांमुळे मजुरांच्या सुटकेसाठी प्रतीक्षा आणखी लांबली आहे.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

उत्तरकाशी जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार बोगद्यातील खोदकाम सध्या थांबले असून इंदूरहून खोदकाम करणारे आणखी एक उच्च क्षमतेचे ‘ऑगर मशीन’ दुर्घटनास्थळी दाखल झाले आहे. तत्पूर्वी, बोगद्यातील ढिगारा भेदण्यासाठी एक ‘अमेरिकन ऑगर मशीन’ दिल्लीहून सिल्क्यारा येथे आणण्यात आले होते. त्याद्वारे शुक्रवारी दुपापर्यंत २२ मीटर खोदकाम करून सहा मीटर लांबीचे चार पाइप बसवण्यात आले होते. पाचवा पाइप बसवण्याचे काम सुरू होते.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एनएचआयडीसीएल) या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, शुक्रवारी दुपारी पाचवा पाइप बसवला जात असताना बोगद्यातून प्रचंड आवाज आला. त्यामुळे बचाव पथकांमध्ये घबराट पसरली आणि बचावकार्य तातडीने थांबवण्यात आले. या प्रकल्पाशी संबंधित एका तज्ज्ञानेही या भागात काही ठिकाणी दरड कोसळल्याचे सांगितले. बोगद्यात ४५ ते ६० मीटपर्यंत ढिगारा साचला आहे. त्याचे खोदकाम बाकी आहे. ढिगाऱ्यात खोदकामाद्वारे अनेक पोलादी पाइप टाकून सुटकेचा मार्ग तयार करून कामगारांना बाहेर काढण्याची योजना दुसऱ्यांदा ठप्प झाली आहे.  

हेही वाचा >>>मजुरांच्या सुटकेच्या आशा पल्लवित; २४ मीटर ढिगारा हटवला

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी शनिवारी सिल्क्यारा येथे सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला आणि अडथळे दूर करण्यासाठी तेथे काम करणाऱ्या यंत्रणांना सर्वतोपरी मदत देण्याचे आदेश दिले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सतत अन्नपदार्थ पुरवले जात आहेत. प्राणवायू, वीजपुरवठा, औषधे आणि पाणीपुरवठा पाइपद्वारे सातत्याने केला जात आहे.

बिहारचा आणखी एक मजूर

बोगद्यात ४१ मजूर अडकल्याची माहिती मिळाली आहे. उत्तरकाशी जिल्हा आपत्कालीन मोहीम केंद्राने जाहीर केलेल्या अडकलेल्या मजुरांच्या नावांच्या अद्ययावत यादीतून ही माहिती मिळाली आहे. या मजुरांत बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी दीपककुमार पटेल यांचाही समावेश असल्याचे बांधकाम कंपनीला समजले.

आवाज क्षीण होत आहे..

त्यांचा आवाज क्षीण होत जात आहे, त्यांची ताकद कमी होत चालली आहे, असे अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी सांगितले. बोगद्यातील अंधारात कामगारांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यामुळे चिंताग्रस्त असल्याचे एका मजुराच्या भावाने सांगितले.