पीटीआय, चेन्नई

दक्षिण तमिळनाडूमधील पूरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून त्यासाठी संरक्षण दले आणि केंद्रीय व राज्य स्तरावरील आपत्ती प्रतिसाद यंत्रणा संयुक्तरित्या प्रयत्न करत असल्याची माहिती राज्य सरकारकडून मंगळवारी देण्यात आली. पुरात अडकलेल्या रहिवाशांपर्यंत अन्नाची पाकिटे पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे.राज्याचे मुख्य सचिव शिव दास मीणा यांनी सांगितले की, आतापर्यंत १० हजार ०८२ व्यक्तींची पूरग्रस्त भागातून सुटका करण्यात आली असून त्यांची व्यवस्था मदत शिबिरांमध्ये करण्यात आली आहे.

सैन्य, नौदलाचे १६८ सैनिक, एनडीआरएफ व एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पूरस्थितीसाठी अधिक निधीची मागणी केली आहे.

हेही वाचा >>>लालकृष्ण आडवाणी-मुरली मनोहर जोशींना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विहिंपचं निमंत्रण; दोन्ही नेते म्हणाले, “आम्ही…”

प्रवाशांची सुटका

तुतुकुडी जिल्ह्यातील श्रीवैकुंठम रेल्वे स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात आली. संरक्षण दलाच्या सैनिकांनी हेलिकॉप्टरचा वापर करून त्यांची सुटका केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना बसमधून जवळच्या रेल्वे स्थानकाकडे पाठवण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.