जम्मू-काश्मीर पोलीस खात्यातील एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची रविवारी बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. ते एका मशिदीत नमाज अदा करत होते, तेव्हाच त्यांच्यावर हल्ला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहम्मद शफी मीर हे शहरातील गंतमुल्ला बाला भागातील स्थानिक मशिदीमध्ये अजान (प्रार्थना) देत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. “दहशतवाद्यांनी मोहम्मद शफी, गंटमुल्ला, शेरी बारामुल्ला येथे गोळीबार केला, मशिदीमध्ये अजानची नमाज पढत असताना ते जखमी झाले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे”, असे काश्मीर झोन पोलिसांनी X वर पोस्ट करत सांगितले.

Congress Leader Kamalnath Promised Giving Article 370 Masjid Place But Real Video Is Different
“३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका
illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

हेही वाचा >> गुजरात बंदरावरील व्यापारी जहाजावर इराणकडून हवाई हल्ला, अमेरिकेचा थेट आरोप

पोलिस सूत्रांनी सांगितले की, मीर २०१२ मध्ये एसएसपी म्हणून निवृत्त झाले होते. काश्मीर खोऱ्यातील सर्वात शांत प्रदेशातील एक रहिवासी असूनही त्यांना वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) द्वारे सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, नुकतीच त्यांची वैयक्तिक सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

गेल्या महिन्यात श्रीनगरच्या ईदगाह मशिदीजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात राज्य पोलिसांचा एक पोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. इन्स्पेक्टर मसरूर अहमद वानी श्रीनगरच्या ईदगाह मैदानावर स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना ही घटना घडली होती.