काझीरंगा अभयारण्य २०१३ मध्ये राष्ट्रीय वारसा घोषित करण्यात आल्यानंतर ५४ गेंडय़ांची शिकार होऊनही गेंडय़ांची संख्या ७२ ने वाढली आहे. गेंडय़ांच्या अलीकडील गणनेनुसार त्यांची संख्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात २४०१ झाली आहे; ती २०१३ मध्ये २३२९ होती, असे काझीरंगा राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे विभागीय वन अधिकारी एस के सील सरमा यांनी सांगितले. गेंडय़ांची संख्या आणखी २०० ने जास्त असण्याची शक्यता असून ते अतिरिक्त भागात फिरत असावेत, त्यांची गणना यात करण्यात आलेली नाही असे त्यांनी सांगितले.
२०१५ च्या गणनेनुसार १६५१ प्रौढ गेंडे आहेत ( त्यात ६६३ नर व ८०२ माद्या व १८६ जणांची लिंगनिश्चिती नाही) २९५ निम्न प्रौढ गेंडे असून त्यात (९० नर,११४ माद्या व ९०  लिंगनिश्चिती नसलेले) आहेत. २५१ लहान गेंडे असून २०५ बछडे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rhinos number increased in kaziranga national park
First published on: 01-04-2015 at 12:03 IST