भारतातील १ टक्का श्रीमंताकडे देशातील ७३ टक्के संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. तर ६७ कोटी भारतीयांच्या संपत्तीमध्ये फक्त एक टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. भारतातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी यानिमित्ताने समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेचा ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’ हा अहवाल रविवारी प्रसिद्ध झाला. देशातील आणि जागतिक पातळीवरील आर्थिक विषमता या अहवालातून समोर येते. जागतिक पातळीवर गेल्या वर्षभरात तयार झालेल्या एकूण संपत्तीतील ८२ टक्के वाटा हा एक टक्का लोकांकडे गेला. ३ अब्ज ७० लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झालेली नाही. भारतातही फार वेगळे चित्र नाही. भारतातील एक टक्का श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये जवळपास २०. ९ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली. जगातील १० देशांमधील सुमारे ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.  सीईओंच्या पगारात कपात करावी, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के लोकांना वाटते. भारतातील ३७ टक्के अब्जाधीशांकडे वारसाहक्काने संपत्ती आल्याचे अहवालातून समोर येते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richest 1 per cent in india cornered 73 per cent of wealth annual oxfam survey show rising income inequality
First published on: 22-01-2018 at 11:01 IST