RJD MLA BhaI Virendra Panchayat-style threat audio clip gose viral : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली वेब सीरिज ‘पंचायत’ चांगलीच गाजली आहे. एका गावातील ग्राम पंचायत कार्यालयाशी निगडीत या शोमध्ये पंचायच सचिव आणि एक आमदार यांच्यात वाद झाल्याचे दाखवण्यात आले आहे. अगदी याप्रमाणेच राष्ट्रीय जनदता दल (आरजेडी) आमदार आणि एक पंचायत सचिव यांच्यात वाद झाल्याची, आणि आमदाराने फोनवरून धमकी दिल्याची कथित घटना समोर आली आहे.

राजेडीचे मानेर येथील आमदार भाई वीरेंद्र यांची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या रेकॉर्डिंगमध्ये आमदार हे एका सरकारी अधिकाऱ्याला त्याने ओळख न दाखवल्याने फटकारताना ऐकू येत आहेत. इतकेच नाही तर बूटाने मारण्याची धमकी देताना देखील ऐकू येत आहेत.

नेमकं काय झालं?

व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपनुसार, भाई विरेंद्र यांनी त्यांच्या मदतारसंघातील एका स्थानिक पंचायत सचिवाला रिंकी देवी या महिलेच्या मृत्यू प्रमाणपत्राची स्थिती विचारण्यासाठी फोन केला होता. पण सचिवाने त्यांना ओळखलेच नाही, यावर आमदार चांगलेच भडकले. “तुम्हाला भाई विरेंद्र माहिती नाहीत? तुम्हाला मी माझी ओळख करून देऊ का? संपूर्ण देश मला ओळखतो.” असे या फोनवर बोलणारा व्यक्ती म्हणजे. हा आवाज कथितपणे भाई विरेंद्र यांचा असल्याचे सांगितले जात आहे. इंडिय टुडेने यासंबंधिचे वृत्त दिले आहे.

यावर सेक्रेटरी अत्यंत शांतपणे उत्तर देतो की, “जर तुम्ही आदराने बोललात, तर मी देखील तसेच करेन. जर जुम्ही वाकडे बोललात तर मी देखील वाकडे बोलेन. मला तुम्हाला घाबरत नाही.” यावर आमदार चांगलेच भडकले, आणि म्हणाले, “जूते से मारूंगा (मी तुला बुटाने मारेन) आणि तुला वाटलं तर तू केस दाखल करू शकतोस. तू प्रोटोकॉल पाळला नाहीस. भाई वीरेंद्र कोण, असं विचारण्याची हिंमत केलीस?”

यावर देखील अधिकारी शांत राहतो आणि आमदाराशी बोलत आहोत हे माहिती नसल्याचे सांगतो. याबरोबरच तो कामाबद्दल बोलण्यास सांगतो. “कृपया कामाबद्दल बोला. तुमची विनंती आधीपासूनच प्रोसेसमधअये आहे,” असे सांगत तो कर्मचारी आमदारांना धमकी न देण्याची विनंती करतो.

पण भडकलेले आमदार वाद घालणे सुरूच ठेवतात. “तुम्हाला स्थानिक आमदार माहिती नसतील तर तुम्हाला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. ट्रान्सफर? हे ट्रान्सफरवर थांबणार नाही. तू नेमकं आहेस कुठला?,” अशा शब्दात आमदार त्या अधिकाऱ्याला सुनावताना ऐकू येत आहे.

आमदार आणि सचिव यांच्यातील हा वाद अ‍ॅमेझॉन प्राइमवरील शो पंचायतमधील आमदार चंद्रकिशोर सिंग आणि सचिव अभिषेक त्रिपाठी यांच्यातील वादाशी जुळणारा आहे. येथे देखील प्रोटोकॉलच्या मुद्द्यावर ये दोघे आपापसांत भिडल्याचे दाखवले गेले आहे.

ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक जण ही शेअर देखील करत आहेत. मात्र या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळता आलेली नाही. यामधील व्यक्तीचा आवाज जरी भाई वीरेंद्र यांच्यासारखाच असला तरी आमदाराने अद्याप व्हायरल क्लिपवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.