स्टेट बँक ऑफ इंडियाने कोट्यावधी खातेदारांसाठी बेसिक बचत खाते (basic savings bank deposit account ) संबंधित अनेक नियम बदलले आहेत. या खातेदारांसाठी रोख रक्कम काढण्यासाठी आणि चेकबुक संदर्भात काही शुल्क निश्चित केले गेले आहेत. हा बदल १ जुलै २०२१ पासून अंमलात येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया गरीबांसाठी शून्य रक्कम शिल्लक ठेवून बचत खाते उघडते. दरम्यान, अशा खातेधारकांना एटीएम, चेकबुक आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी आता नवीन नियम लागू होतील.

बँकेच्या म्हणण्यानुसार, BSBD खातेधारक आता कोणत्याही शाखेत किंवा एटीएममधून महिन्यातून फक्त ४ वेळा कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढू शकतील. यानंतर त्यांना पैसे काढताना १५ रुपये अधिक जीएसटी स्वरुपात द्यावे लागतील. हे शुल्क एसबीआय किंवा नॉन-एसबीआय दोन्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागू होईल.

हेही वाचा- नागरी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आता अर्थ‘शिक्षित’च

केवळ १० चेक असलेले चेकबुक मोफत मिळणार

तसेच BSBD खातेधारकांना दरवर्षी केवळ १० चेक असलेले चेकबुक मोफत मिळणार आहे. यानंतर, घेतलेल्या प्रत्येक चेकबुकसाठी त्यांना ४० रुपये शुल्क जीएसटी स्वरूपात द्यावे लागेल. जर त्यांनी २५ चेक असलेले चेकबुक घेतले तर त्यांना ७५ रुपये शुल्क द्यावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांकडून चेकबुक शुल्क घेतले जाणार नाही.

हेही वाचा- फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडला दिलासा

याशिवाय अशा खातेधारकास NEFT किंवा RTGS सारख्या इतर व्यवहारांवर कोणताही अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही. KYC ची कागदपत्रे असलेली कोणतीही व्यक्ती एसबीआय बेसिक बचत बँक खाते उघडू शकते. एसबीआय BSBD खात्यात खातेदार किमान शिल्लक रक्कम शून्य ठेऊ शकतो. त्याअंतर्गत ग्राहकांना रुपे ATM/debit card दिले जाते.  जर एखाद्या व्यक्तीने बँकेत BSBD खाते उघडले असेल तर तो बँकेत अन्य कोणतेही बचत खाते उघडू शकत नाही. तसेच रुपे कार्डवर कोणताही प्रकारचा वार्षिक देखभाल शुल्क आकरल्या जाणार नाही.