भारतीय नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत असलेला इस्लामिक स्टेटचा दहशतवाद्याला रशियाने ताब्यात घेतले आहे. हा अतिरेकी भारतातील सत्ताधारी पक्षातील नेत्यावर आत्महघातकी हल्ला करण्यासाठी भारतात येणार होता, त्यापूर्वीच रशियाने ही कारावाई केली.

रशियातील फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने (FSB) दिलेल्या माहितीनुसार त्यांनी इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या एका अतिरेक्याला ताब्यात घेतले आहे. तो मध्य आशियाईतील रहिवासी आहे. इस्लामिक स्टेटच्या अन्य अतिरेक्यांच्या मदतीने भारतीय नेत्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती. भारतातील सत्ताधारी पक्षातील नेते त्याच्या टार्गेटवर होते.

हेही वाचा – OBC Reservation in Maharashtra: शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; म्हणाले, “पुढील पाच आठवडे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने या अतिरेक्याचा एक व्हिडीओही जारी केला आहे. या व्हिडीओत त्याने प्रेषक मोहम्मद यांच्या अवमान केल्याचा आरोप करत बदल्याच्या भावनेने हा हल्ला करणार असल्याचे म्हटले आहे. हा अतिरेकी एप्रिल ते जून दरम्यान टर्कीत होता, तिथेच एका इस्लामिक स्टेट नेत्याने त्याल आत्मघातकी बनण्याचे ट्रेनिंग दिले. इंस्तांबूलमध्ये त्यांच्या बैठका होत होत्या, अशी माहितीही फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी दिली.