गेल्या काही काळापासून युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत रशियाने युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून हे युद्ध सुरू आहे. युक्रेनही रशियाला चिवटपणे झुंज देत आहे. तेव्हापासून भारतासह जगभरात युक्रेनची चर्चा आहे. दरम्यान, भारतात युक्रेनची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. परंतु यावेळी युक्रेनच्या समर्थनात नव्हे तर विरोधात चर्चा सुरू आहेत. कारण, देशात युद्धजन्य परिस्थिती असताना युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या एका ट्विटमुळे भारतात सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने कालीमाता या हिंदू देवतेशी साम्य असलेला एक आक्षेपार्ह फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून भारतीय नेटकरी युक्रेनवर चांगलेच संतापले आहेत. तसेच हे ट्वीट ‘हिंदूफोबिक’ असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, आता भारतीयांच्या, प्रामुख्याने हिंदुंच्या समर्थनात रशिया मैदानात उतरला आहे. रशियाने युक्रेनच्या या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच युक्रेनची तुलना नाझीवादाशी केली आहे.

हे ही वाचा >> हुंडा नको म्हणत मुलगा लग्नाला तयार, पण दागिने कमी म्हणून नवरीचा फेऱ्यांना नकार; भर मंडपातून नवरदेवानं गाठलं पोलीस ठाणं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संयुक्त राष्ट्रात रशियाचे प्रतिनिधी दिमित्री पोलिन्स्की म्हणाले की, “किव (युक्रेन) सरकार कोणाच्याही आस्थेची परवा करत नाही, मग तो हिंदू असो, मुस्लीम असो अथवा ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स (कॅथलिक) असो. युक्रेनचे सैनिक कुराण जाळत आहेत, काली मातेचा अवमान करत आहेत. त्याचवेळी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांची पवित्र स्थळं नष्ट करत आहेत. ते केवळ नाझी विचारसरणीचं अनुसरण करतात. त्यांच्यासाठी युक्रेन सर्वश्रेष्ठ आहे.” दरम्यान, भारतीयांच्या रोषानंतर युक्रेन सरकारने ते ट्वीट डिलीट केलं आहे. तसेच माफीदेखील मागितली आहे.