वॉशिंग्टन/मॉस्को : युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय महासंघाने निवडक रशियन बँकांना ‘स्विफ्ट’ या जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून हद्दपार करण्याबरोबरच रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध लादले. या कठोर निर्बंधांमागे रशियाची अर्थक्षमता नियंत्रित करून युद्धाचा अर्थपुरवठा खंडित करण्याचा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा हेतू आहे.

अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि कॅनडाने रशियावरील आर्थिक निर्बंधांना मान्यता दिल्यानंतर काही रशियन बँकांना ‘स्विफ्ट’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. रशियाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असलेली ‘तेल आणि वायू निर्यात’ ‘स्विफ्ट’वर अवलंबून आहे. त्यामुळे या निर्बंधांचा रशियाला मोठा फटका बसेल, असा अंदाज आहे.

joi biden
अन्वयार्थ: बायडेन प्रशासनाचा नैतिक विजय..
stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
Vladimir putin and joe biden
जगात पुन्हा अमेरिका वि. रशिया? युक्रेनच्या मदतीला यूएसचा शस्त्रसाठा; चीन-इराण रशियाला मदत करत असल्याचा दावा!
IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?

‘स्विफ्ट’ ही जगातील मुख्य बँकिंग संदेश सेवा आहे. भारतासह २००हून अधिक देशांमधील सुमारे ११ हजार बँका आणि वित्तसंस्थांना ती सेवा पुरवते. ही प्रणाली जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदेशवहनात केंद्रस्थानी असल्याने रशियाला गंभीर आर्थिक परिणामांचा सामना करावा लागेल, असे सांगण्यात येते.

रशियन सैन्याचे युक्रेनवर हवाई हल्ले सुरू असताना मित्रराष्ट्रांनी शनिवारी कठोर आर्थिक निर्बंधांचा निर्णय घेतला. त्यानुसार रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या काही मालमत्ताही गोठवल्या जाणार आहेत. त्यामुळे परदेशातील राखीव अर्थसाठे मिळवण्याच्या रशियाच्या क्षमतेवर अंकुश येईल. मित्रराष्ट्रांनी घातलेल्या निर्बंधांचा प्रभाव कमी करण्यासाठी रशिया युद्धासाठी पैसा वापरणे थांबवेल, असा या निर्बंधांमागील हेतू आहे.

मित्रराष्ट्रांची भूमिका..

रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी युक्रेन सरकार आणि तेथील शूर नागरिक करीत असलेल्या प्रयत्नांना आमचा पािठबा आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. रशियाने पुकारलेले युद्ध हे दुसऱ्या महायुद्धापासून प्रचलित असलेले मूलभूत आंतरराष्ट्रीय नियम आणि निकषांवर झालेल्या हल्ल्याचे द्योतक आहे. त्यामुळे आम्ही त्या मूलभूत नियमांचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहोत. हे युद्ध म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे धोरणात्मक अपयश आहे. त्यामुळे आम्ही या युद्धास त्यांनाच जबाबदार धरू.

हवाई निर्बंध

युरोपियन महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतेक युरोपीय देश रशियावर हवाई वाहतूक निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रशियाला पश्चिमेकडे संपूर्ण हवाई नाकाबंदीचा सामना करावा लागू शकतो.

युद्धस्थिती..

’युक्रेनच्या खार्किव्ह या दुसऱ्या मोठय़ा शहरात रस्त्यावरील लढाईला तोंड फुटले असून रविवारी रशियन सैन्याचा दक्षिणेकडील मोक्याच्या बंदरांवर हल्ला.  

’रशियन सैन्याला तीव्र प्रतिकार करून खार्किव्हवरील हल्ला परतवून लावण्यात आला. रात्रभर रस्त्यावरील लढाई झाली, आता शहरात एकही रशियन सैनिक नसल्याचा तेथील गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह यांचा दावा.

’युक्रेनचे लष्करी हवाई तळ आणि इंधनपुरवठा सुविधांना लक्ष्य केल्यानंतर रशियन सैन्याने आपला मोर्चा अन्यत्र वळवल्याचे वृत्त.

’संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय मानवी हक्क आयुक्तालयाच्या माहितीनुसार युक्रेनमधील युद्धात २४० नागरिकांचा मृत्यू, तीन हजार रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा.

’आम्ही आमच्या देशासाठी लढत आहोत, आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत, आमचा तो अधिकार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे वक्तव्य. शांतता चर्चेचही तयारी़

’युक्रेनमधील दोन लाखांहून अधिक निर्वासित शेजारच्या देशांत आश्रयाला, पोलंडमध्ये १,१५,०००हून अधिक निर्वासित दाखल.

मोदींकडून आढावा

नवी दिल्ली : युक्रेनप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली़  या बैठकीत परराष्ट्रमंत्री एस़  जयशंकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत़े  युक्रेनमधून भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेचा मोदी यांनी आढावा घेतला़

अर्थचाल

रशियन कंपन्या आणि रशियन धनाढय़ वर्गाच्या मालमत्ता शोधून काढण्यासाठी संयुक्त कार्य दल स्थापण्याचा अमेरिका, युरोपीय कमिशनचा निर्णय.

निवडक रशियन बँका ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय वित्तीय संदेश प्रणालीतून हद्दपार झाल्याने जागतिक स्तरावर काम करण्याच्या त्यांच्या क्षमतेला हानी़ रशियाविरोधात प्रतिबंधात्मक उपायांसाठी वचनबद्धतेची मित्रराष्ट्रांची ग्वाही. रशियावर आर्थिक निर्बंध लादून रशियन सेंट्रल बँकेचा जागतिक आर्थिक व्यवहारातील प्रभाव कमी करण्याची मित्रराष्ट्रांची चाल.

अण्वस्त्र सतर्कतेचे पुतिन यांचे आदेश

किव्ह : रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चिमात्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्र दलास सतर्क राहण्याचे आदेश रविवारी दिले. नाटो देशांच्या आक्रमक विधानांमुळे आपण हे आदेश दिल्याचे समर्थनही पुतिन यांनी केले. पुतिन यांनी अण्वस्त्र सतर्कतेचे आदेश देताना केवळ ‘नाटो’ देशांच्या कथित विधानांचाच नाही, तर पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांचाही उल्लेख केला.

६८८ भारतीय मायदेशी

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमधील ६८८ भारतीय रुमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून एअर इंडियाच्या तीन विमानांतून मायदेशी परतले. शनिवारपासून ९०७ नागरिकांना परत आणण्यात आले आहे. सुमारे १३ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले असून, त्यांना शक्य तितक्या लवकर परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.