महाराष्ट्रामध्ये १७ जागांवर चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे. या चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यंदा प्रथमच महिलांसाठी विशेष सखी बूथ प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार करण्यात आला आहे. तर असाच सखी बूथ हडपसर येथील साधना महाविद्यालयामध्ये तयार करण्यात आला. या बूथमध्ये येणार्‍या प्रत्येक महिलेस गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात येत आहे. या बूथ मधील सर्व काम महिला काम पाहत असून गुलाबी रंगाच्या पोषाखात महिला कर्मचारी उपस्थित आहेत.

आज सकाळी सात वाजल्यापासून हडपसर येथील साधना महाविद्यालयामध्ये मतदानास सुरुवात झाली. या ठिकाणी अनेक बूथ होते. पण यामध्ये सखी बूथ हा सर्वांचा लक्ष वेधून घेत होता. या बूथ बाहेर फुगे लावले, रांगोळी काढण्यात आली, सेल्फी पॉईंट आणि लहान मुलांसाठी पाळणा ठेवण्यात आला होता. त्यामुळे या महाविद्यालयात येणारा प्रत्येक मतदार सखी बूथच्या परीसरात काही क्षण थांबून पुढे जात होता. मतदानासाठी बुथमध्ये जाताना दरवाजातच महिलांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले जात होते. प्रत्येक महिला यंदा काय विशेष असे महिला कर्मचाऱ्यास विचारात होत्या. यंदा निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सखी बूथ तयार करण्यात आला असून महिलांसाठी विशेष सेवा असल्याचे सांगण्यात आले. हे सांगितल्यावर अनेक महिलांच्या चेहर्‍यावर एक समाधान पाहण्यास मिळाले. आजवर कधी ही मतदान केंद्रावर अशा प्रकारची सेवा दिली गेली नाही. त्यामुळे अशा अनोख्या उपक्रमाचे महिला वर्गाकडून स्वागत करण्यात आले.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Shashikant Shinde denied all allegations of corruption in Mumbai Bazaar Committee
मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप शशिकांत शिंदे यांनी फेटाळले
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

 

माझ्या बोटावर शाई….

 

गुलाबाची फुले देऊन स्वागत

 

मतदान भविष्यासाठी….

 

राष्ट्रीय जबाबदारी…

 

प्रवेशद्वारावर फुग्यांची सजावट

 

बाळांसाठी पाळणा

या उपक्रमाबाबत मतदान करण्यासाठी आलेल्या अनेक महिलांशी संवाद साधला असता त्यांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतूक केले.  मीनाक्षी गरुड म्हणाल्या की, मी आजअखेर किमान लोकसभेचे तीन वेळा मतदान केले आहे. पण यंदा प्रथमच मतदान बुथवर एका महिलेकडून दुसर्‍या महिलेचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत होणे पाहिलीच वेळ आहे. हे पाहून छान वाटले. असे उपक्रम वाढल्यास भविष्यात निश्चित मतदानाची आकडेवारी वाढण्यास देखील मदत होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘मी लोकसभा आणि विधानसभा मिळून दहा वेळा मतदान केले. मतदान करण्यासाठी आल्यावर गुलाबाचे फूल देऊन स्वागत किंवा लहान मुलांसाठी बाहेर पाळणा असे केव्हाच पाहिले नव्हते. मात्र यंदा प्रथमच अशी सुविधा पाहिल्याने खूप छान वाटले आहे. अधिकारी वर्गाकडून प्रत्येक मतदाराची देखील प्रत्येक क्षणाला विचारपूस करीत असल्याचे पाहून छान वाटले’ असे मत संगीता पवार यांनी व्यक्त केले.  त्याच बरोबर आज सुट्टीच्या दिवशी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि आपली लोकशाही बळकट करावी. असे आवाहन देखील या महिलांनी यावेळी केले.