निवडणुकीच्या प्रचारासाठी बॉलीवूडमधील अभिनेत्यांना प्रचारात उतरविण्याचे लोण आता श्रीलंकेतही पसरले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांच्या प्रचारासाठी अभिनेता सलमान खान श्रीलंकेत दाखल झाला आहे.
श्रीलंकेत जन्मलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नाडिस हिच्यासह सलमान खान आणि बॉलीवूडमधील अन्य पाच जण राजपक्षे यांच्या समर्थनार्थ श्रीलंकेतील व्यासपीठावर अवतरण्याच्या तयारीत आहेत. सलमान खान याला राजपक्षे यांचे पुत्र नमल यांनी निमंत्रित केले आहे, असे वृत्त ‘एशिया मिरर’ या स्थानिक संकेतस्थळाने दिले आहे.जॅकलीन फर्नाडिस ही माजी ‘मिस श्रीलंका’ असून ती नमल राजपक्षे यांची मैत्रीण आहे.
निवडणूक प्रचारासाठी बॉलीवूडमधील अभिनेते श्रीलंकेत अवतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. सत्तारूढ आघाडीपासून फारकत घेऊन अनेक विरोधी पक्षांनी हातमिळवणी केल्याने राजपक्षे यांना मिळत असलेला पाठिंबा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामुळे बॉलीवूडच्या अभिनेत्यांमुळे राजपक्षे यांना नैतिक बळ प्राप्त होईल, असा निरीक्षकांचा अंदाज आहे.केवळ सलमान खानच नव्हे तर भाजपचे समाजमाध्यम गुरू अरविंद गुप्ता हेही प्रचारात सहभागी होणार आहेत.
श्रीलंकेच्या अध्यक्षपदासाठी ८ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2014 रोजी प्रकाशित
सलमान,जॅकलीन श्रीलंकेत प्रचाराला
निवडणुकीच्या प्रचारासाठी बॉलीवूडमधील अभिनेत्यांना प्रचारात उतरविण्याचे लोण आता श्रीलंकेतही पसरले आहे.

First published on: 29-12-2014 at 03:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan jacqueline fernandez campaign for mahinda rajapaksa