देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंह यादव यांचे निकटवर्तीय आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय सैन्याच्या जवानांवर आझम खान यांनी अप्रत्यक्षपणे बलात्काराचा आरोप केला आहे. आझम खान यांच्या या विधानावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा एक व्हिडीओसमोर बुधवारी समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आझम खान म्हणतात, दहशतवाद्यांनी सैन्यातील जवानांचे गुप्तांग कापून नेले. त्यांना जवानांच्या हात, डोक किंवा पायावर आक्षेप नव्हता. त्यांना शरीराच्या ज्या भागावर आक्षेप होता तोच भाग त्यांनी कापून नेला. या घटनेमुळे संपूर्ण देशाची नाचक्की झाली असून आपण जगाला काय तोंड दाखवणार आहोत असा सवाल त्यांनी विचारला आहे.

आझम खान यांचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. प्रकरण चिघळत असल्याचे दिसताच समाजवादी पक्षाने आझम खान यांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. सध्या देशातील परिस्थिती संवेदनशील असताना आझम खान यांनी हे विधान केले असून या विधानाची आम्ही निंदा करतो असे सपाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तर भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह यांनी आझम खान यांच्यावर टीका केली. आझम खान हे फुटिरतावादी आणि दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत. समाजवादी पक्षच त्यांच्या नेत्यांना असे वादग्रस्त विधान करायला लावत असल्याचा आरोप भाजपने केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party leader azam khan controversial remark on army misbehaving with people
First published on: 28-06-2017 at 13:50 IST