सॅमसंगने गेल्या आठवड्यात अमेरिकेतील बाजारात सादर केलेला ‘गॅलॅक्सी एस४’ हा आतापर्यंतचा सर्वांत वेगवान स्मार्टफोन ठरलाय. लॉंचिंगच्या दिवसापासूनच या स्मार्टफोनमधील फिचर्समुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. अॅपलचे पारंपरिक मार्केट असलेल्या अमेरिकेमध्ये ‘गॅलॅक्सी एस४’ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
‘प्रायमेट लॅब्स’ या हॅण्डसेट उत्पादनात संशोधन करणाऱया कंपनीने ‘गॅलॅक्सी एस४’ची तुलना बाजारातील इतर स्मार्टफोनशी केली होती. ज्या पातळ्यांवर ही तुलना केली, त्यामध्ये ‘गॅलॅक्सी एस४’ला सर्वाधिक ३,१६३ गुण मिळाले. ‘गॅलॅक्सी एस४’शी तुलना करेल, असा दुसऱा स्मार्टफोन ‘एचटीसी वन’ हा आहे. या हॅण्डसेटमधील फिचर्सला २,६८७ गुण मिळाले. ‘गॅलॅक्सी एस४’ स्मार्टफोनमधील ‘क्वॅड-कोअर क्वालकॉम प्रोसेसर’ आताच्या इतर स्मार्टफोनपेक्षा खूप प्रबळ असल्याचे या तुलनेमधून स्पष्ट झाले.
तुलनेमध्ये अॅपलचा आयफोन पाचव्या क्रमांकावर फेकला गेलाय. तुलनेमध्ये आयफोनला अवघे १५९६ गुण मिळाले आहेत. सहा वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा आयफोन लॉंच झाला होता, त्यावेळी याच कंपनीने केलेल्या तुलनेमध्ये आयफोनला १३० गुण मिळाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2013 रोजी प्रकाशित
सॅमसंगचा ‘गॅलॅक्सी एस४’ आतापर्यंतचा सर्वाधिक वेगवान स्मार्टफोन
सॅमसंगने गेल्या आठवड्यात अमेरिकेतील बाजारात सादर केलेला 'गॅलॅक्सी एस४' हा आतापर्यंतचा सर्वांत वेगवान स्मार्टफोन ठरलाय.

First published on: 20-03-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy s4 declared fastest smartphone ever