Santiago Martin : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने मोठी कारवाई केली आहे. ‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनच्या विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी कारवाई तीव्र केली आहे. आज (१८ नोव्हेंबर) ईडीने सँटियागो मार्टिन आणि त्यांची कंपनी मेसर्स फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रा.लि.शी संबंधित तब्बल २२ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत ईडीने तब्बल १२.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच ६.४२ कोटी रुपयांची एफडीआर गोठवण्यात आली आहे.

आज ईडीने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मेघालय आणि पंजाबसह आदी २२ ठिकाणी शोध मोहीम राबवत छापेमारी केली. यावेळी ईडीने कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. याच कारवाई दरम्यान, ईडीने १२.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. तसेच ६.४२ कोटी रुपयांची एफडीआर गोठवण्यात आली. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

हेही वाचा : Viral Video :…अन् कार्यकर्त्यांची तुंबळ हाणामारी जागेवर थांबली! सामाजिक भान जपणाऱ्या केरळमधील दोन राजकीय गटांचा Video चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनच्या विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून अनेकदा याआधीही कारवाई करण्यात आली होती. आजही ईडीने सँटियागो मार्टिन आणि त्याच्या काही कंपनीवर छापे टाकले. पीएमएलए २००२ च्या तरतुदीनुसार ईडीने ही कारवाई केल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, मार्टिन हे १,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे निवडणूक रोखे असलेले राजकीय पक्षांना सर्वात मोठे देणगीदार होते. मात्र, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. तसेच ईडी २०१९ सून तामिळनाडूमध्ये या लॉटरी किंगची चौकशी करत आहे.