पाकिस्तानी तुरुंगात मृत्युमुखी पडलेले भारतीय कैदी सरबजित सिंह यांच्या हत्येची चौकशी करणारे पाकिस्तानी न्यायमूर्ती सैद मझहर अली अकबर भारतात येण्याची शक्यता आहे. लाहोर उच्च न्यायालयाचे नक्वी हे सरबजित यांच्या मृत्यूची चौकशी करत आहेत.
लाहोर कारागृहात २६ एप्रिलला कैद्यांनी सरबजित यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर २ मे रोजी सरबजित यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एक सदस्सीय लवादाची स्थापना करण्यात आली. लवादाने भारतीय नागरिकांना या संदर्भात काही माहिती असेल तर संबंधित कागदपत्रांसह सात दिवसांत सादर करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे असल्याचे न्यायमूर्तीचे खासगी सचिव रियाझ अहदम यांनी सांगितले. गरज भासली तर नक्वी भारतात येऊ शकतात, असेही अहमद यांनी स्पष्ट केले.

New Parliament Building Inauguration: जवाहरलाल नेहरूंचा फोटो ट्वीट करत काँग्रेस व भाजपामध्ये रंगला कलगीतुरा!