फ्रान्समधील धनाढय़ महिलेकडून आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांच्यावर ठेवण्यात आल्याने त्यांच्या राजकीय पुनरागमनाची शक्यता धूसर झाली आहे. पक्षासाठी बेकायदेशीरपणे निधी गोळा करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
या आरोपाबाबत सारकोझी यांची चौकशी करावी या निर्णयाविरुद्ध आम्ही अपील करत असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. ‘लोरिअल’च्या लिलियन बेटनकोर्ट या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अतिशय गंभीर अवस्थेत असताना सोरकोझी यांनी त्यांच्याकडून आर्थिक गैरलाभ मिळविल्याचा आरोप आहे.