scorecardresearch

Satish Kaushik Passes Away : प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन

Sathish Kaushik Died : चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

Satish Kaushik Death Updates
सतीश कौशिक यांचे निधन

Satish Kaushik Death : चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.

हेही वाचा – वयाच्या ५६ व्या वर्षी सतीश कौशिक यांना सरोगसीच्या मदतीने झाली होती मुलगी

ते म्हणाले, ”मला माहित आहे की, मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. पण हे मी माझा मित्र सतीश कौशिक बद्दल लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ४५ वर्षांच्या मैत्रीचा असा अचानक अंत झाला. ओम शांती!

हेही वाचा – ‘कुली’चं चित्रीकरण करताना मृत्यूच्या दाढेतून सुखरुप परतलेले अमिताभ बच्चन; ‘वैद्यकीयदृष्ट्या मृत’ केलं होतं घोषित

सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुरालसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 07:35 IST
ताज्या बातम्या