सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवडयाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही  स्थगिती आणखी आठवडयाभरासाठी वाढवली जाऊ शकते. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्ट्रेन नियंत्रणाबाहेर असल्याचं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियाने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौदीच्या जीएसीएने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. जगभरातील अनेक देश आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करत असून ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. करोना व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन वेगाने फैलवणारा असून नियंत्रणा बाहेर असल्याचं यूकेमधल्या तज्ज्ञांच मत आहे.

आणखी वाचा- करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगाची वाढली चिंता; आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

काही अपवाद वगळता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आठवडयाभरासाठी विमानसेवा बंद करण्यात येत आहे. आणखी आठवडयाभरासाठी ही बंदी वाढवली जाऊ शकते. सौदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व परदेशी विमानांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलीय असे जीएसीएच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘चिंता करण्याची आवश्यकता नाही’, करोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे विधान

मागच्या आठवडयात सौदीमध्ये फायझरची लस पोहोचली. लवकरच तिथे लसीकरणाला सुरुवात होईल. सौदीमध्ये आतापर्यंत तीन लाख ६१ हजार पेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सहाहजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saudi arabia halts all international flights for a week amid new corona strain dmp
First published on: 21-12-2020 at 12:39 IST