गैरप्रकारांमुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा चार आठवड्यांमध्ये पुन्हा घेणे शक्य नसल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) गुरुवारी न्यायालयापुढे स्पष्ट केले. फेरपरीक्षा घेण्यासाठी आणखी मुदत देण्याची विनंती सीबीएसईकडून न्यायालयाकडे करण्यात आली. त्यावर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दाखविली आहे.
मे महिन्यात घेण्यात आलेली ही परीक्षा ४४ विद्यार्थ्यांनी केलेल्या गैरप्रकारांमुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली असून, आता ६.३ लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी सीबीएसईला न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली होती. सुटीतील पीठाचे न्यायमूर्ती आर. के. अगरवाल व न्या. अमिताव रॉय यांनी या परीक्षेशी संबंधित संस्थांनी नव्याने परीक्षा घेण्यासाठी सीबीएसई या संस्थेची मदत घेण्यास सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने चार आठवड्यांमध्ये फेरपरीक्षा घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.
वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा रद्द

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc agrees to hear cbse plea seeking more time to re conduct aipmt 2015 exam
First published on: 18-06-2015 at 11:38 IST