सन २००२ मधील गुजरात दंगलींदरम्यान नरोडा पटिया हिंसाचारप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांनी आपल्याला झालेल्या जखमेचे तसेच भाजल्याच्या व्रणांचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावे, त्यानंतरच त्यांच्या जामीन अर्जावर विचार करण्यात येईल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. तीन महिन्यांसाठी वैद्यकीय आधारावर जामिनास मुदतवाढ देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर या निर्णयाविरोधात कोडनानी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या भाजल्या आहेत, याबद्दल दुमत नाही मात्र याविषयीचा खुलासा त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे करावा, असे न्या. एच. एल. दत्तू आणि न्या. एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘माया कोडनानी यांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे’
सन २००२ मधील गुजरात दंगलींदरम्यान नरोडा पटिया हिंसाचारप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांनी आपल्याला
First published on: 14-02-2014 at 02:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc asks for affidavit of burn injury for maya kodnanis bail plea