फटाके बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सण महत्त्वाचे आहेत, हे आम्ही समजू शकतो पण….

संग्रहित छायाचित्र

फटाक्यांवर बंदी घालण्याच्या कोलकात्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. “सण महत्त्वाचे आहेत, हे आम्ही समजू शकतो. पण सध्या आयुष्यच धोक्यात आहे. सध्या जीवन वाचवण्यापेक्षा मोठी मूल्ये कोणतीच असू शकत नाही” असे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी पाच नोव्हेंबरला काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्यावेळी पश्चिम बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रीवरही बंदी घातली. एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

मुंबईत फटाके विक्रीस मुभा पण….
दिवाळी पाच दिवसांवर आली असताना मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यावर बंदीचा निर्णय घेतला. फटाके विक्रीस मात्र मुभा असणार आहे. फटाक्यांवरील निर्बंधामुळे मागणीअभावी विक्रेत्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने यंदा दिवाळीमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. केवळ लक्ष्मीपूजनच्या दिवशी फुलबाजे आणि अनारसारख्या फटाक्यांना परवानगी देण्यात आली आहे.

अन्य आवाजाच्या फटाक्यांवर बंदी असून, आदेश धुडकावून फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्यांविरुद्ध पालिका आणि पोलिसांमार्फत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणीच नव्हे तर हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायिक परिसर आदी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sc rejects plea challenging calcutta hc order against ban on fire crackers dmp

ताज्या बातम्या