जागतिक पातळीवर हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे १९९० च्या दशकाच्या तुलनेत तीन पटींनी वाढले असून इ.स. २१०० पर्यंत ४ ते ६ अंशांनी तपमानवाढ होणार आहे, असा इशारा ऑस्ट्रेलियातील एका वैज्ञानिकाने दिला आहे. पेप कॅनडेल यांनी लिहिलेल्या शोधनिबंधात असे म्हटले आहे, की २०१२ मध्ये हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढले आहे. जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे ३६ अब्ज टन इतके हरितगृह वायू वातावरणात सोडले गेले आहेत. प्रमाण १९९०च्या दशकाचा विचार करता ५८ टक्के आहे व तुलनेने ही वाढ तीन पटींनी अधिक आहे. कॅनडेल यांच्या मते हरितगृह वायूंच्या उत्सर्जनातील वाढीत ८० टक्के वाटा हा चीनचा आहे उर्वरित वाटा हा विकसित देशांचा आहे. विकसनशील देशांचा क्रमांक खूप खाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात तीन पट वाढ
जागतिक पातळीवर हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे १९९० च्या दशकाच्या तुलनेत तीन पटींनी वाढले असून इ.स. २१०० पर्यंत ४ ते ६ अंशांनी तपमानवाढ होणार आहे, असा इशारा ऑस्ट्रेलियातील एका वैज्ञानिकाने दिला आहे.
First published on: 04-12-2012 at 02:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scientist warns of growing carbon emissions