प्लुटोचे ग्रहपद गेल्यामुळे आता सौरमालेत आठच ग्रह आहेत असे मानले जाते, पण आता प्लुटोचे ग्रहपद घालवणाऱ्याचा वैज्ञानिकाने नेपच्यूनसारखा नववा ग्रह सौरमालेत आहे असा दावा केला आहे. कॅलिफोíनया विद्यापीठातील दोन खगोलवैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार हा नववा ग्रह आहे यात शंका नाही व तो ग्रहाच्या व्याख्येत बसणारा आहे. नववा ग्रह आधी प्लुटो होता पण तो ग्रहाच्या व्याख्येत बसत नसल्याने त्याला बटुग्रह मानण्यात आले, तेव्हापासून सौरमालेत आठ ग्रह आहेत. कॅलिफोíनया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ग्रहविज्ञानाचे प्राध्यापक मायकेल ब्राऊन यांच्या मते आपल्या सौरमालेत नक्कीच नववा ग्रह आहे. ब्राऊन व त्यांचे सहकारी काँन्स्टंन्टाइन बाटिग्यान यांनी सांगितले की अजून हा ग्रह सापडलेला नाही पण तो गणिती आधाराने शोधला आहे. त्यामुळे लगेच सौरमालेत नऊ ग्रह आहेत असा निष्कर्ष काढता येणार नाही.
द अस्ट्रॉनॉमिकल जर्नल या नियतकालिकात ब्राऊन व बाटिग्यान यांनी या ग्रहाच्या अस्तित्वाचा परिस्थितीजन्य पुरावा दिला आहे. अंडाकार कक्षा असलेल्या अनेक खगोलांचा अभ्यास करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.
वैज्ञानिकांनी म्हटल्यानुसार सौरमालेतील एकाच कोनातील सहा वेटोळ्यांचा विचार केला असून त्या कक्षा एका सारख्याच कोनातून कललेल्या आहेत, पण त्यात हा ग्रह सापडण्याची शक्यता १४ हजारात एक आहे असे बाटिग्यान यांचे मत आहे. या नवव्या ग्रहाचे गुरुत्वही जास्त आहे व त्याच्या प्रभावामुळे या कक्षा कलल्या असाव्यात असा अंदाज आहे. हा ग्रह पृथ्वीइतका मोठा असावा किंवा नेपच्यूनपेक्षा मोठा असावा, त्याचे वातावरण विरळ असावे व अंतर्भाग कठीण खडकाचा असावा असे मानले जाते. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या दहा पट असावे व त्याचे वस्तुमान प्लुटोच्या ४५०० पट असावे. प्लुटो सूर्यापासून खूप दूर म्हणजे ४.६ अब्ज मल अंतरावर आहे. आता नववा ग्रह २० अब्ज मल अंतरावर असू शकतो व तो सर्वात लांबचा ग्रह असेल. त्याची कक्षा शोधण्यात मात्र अडचणी आहेत. फ्रान्सच्या वेधशाळेचे वैज्ञानिक अलेसांद्रो मार्बीडेली यांच्या मते सौरमालेत नववा ग्रह नक्की आहे. आता त्याचा पाठलाग चालू ठेवायला हवा, तरच तो सापडेल. हा ग्रह पृथ्वीच्या दहा पट वस्तुमानाचा असूनही दिसत का नाही तर तो कुईपर पट्टय़ाच्या पलीकडे आहे व तेथे प्लुटोही आहे पण त्याचे ग्रहपद गेलेले आहे. कुईपर पट्टा हा बर्फाळ व इतर वस्तूंचा कचरा असलेला एक पट्टा आहे. जर नवा ग्रह खरोखर असेल तर तो दीडशे वर्षांनंतर शोधला गेलेला पहिला ग्रह असणार आहे कारण नेपच्यूनचा शोध १८४६ मध्ये लागला होता. खगोलवैज्ञानिक ग्रेगरी लॉलिन यांच्या मते हा ग्रह आहे पण तो अजून दिसलेला नाही, जर तो असेल तर हा मोठा शोध राहील. विशेष म्हणजे ग्रेगरी यांनी पहिल्यांदा त्यांच्या शोधनिबंधात या ग्रहाची शक्यता मांडली होती. कुईपर पट्टा हा नवीन ग्रह ५० खगोल एकक अंतराच्या पलीकडे आहे (खगोल एकक म्हणजे पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतर) तो सूर्याच्या जास्तीत जास्त २०० खगोल एकक इतका जवळ येऊ शकतो. म्हणजेच सूर्यापासून त्याचे अंतर सर्वात जवळच्या स्थितीतही १८.६ अब्ज मल असणार आहे व त्याची कक्षा सौरमालेच्या केंद्रापासून ६०० ते १२०० खगोल एकक इतकी दूर असेल त्यामुळे तो सापडणे अवघड आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2016 रोजी प्रकाशित
सौरमालेत नववा ग्रह असल्याचा वैज्ञानिकांचा दावा
प्लुटोचे ग्रहपद गेल्यामुळे आता सौरमालेत आठच ग्रह आहेत असे मानले जाते

First published on: 28-01-2016 at 01:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scientists claim is pluto killer thinks he has new ninth planet