Kota Student Sucide : राजस्थानमधील कोटा शहर आयआयटी प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांच्या कोचिंगचे हब मानले जाते. गेल्या काही वर्षांत कोटामध्ये आयआयटीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दोन विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये २० वर्षीय अभिषेक लोढा नावाच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे.

दरम्यान अभिषेक लोढाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, “मी अभ्यास करू शकत नाही. ते माझ्या आवाक्याबाहेर आहे. मला माफ करा,” असे म्हटले आहे.

दरम्यान आत्महत्या केलेला विद्यार्थी अभिषेक लोढा हा मूळचा मध्य प्रदेशातील गुना शहरातील होता. गेल्या मे महिन्यात तो जेईई परीक्षेची (आयआयटी प्रवेश परीक्षा) तयारी करण्यासाठी कोटा येथे आला होता.

त्याने स्वतः कोटाला जाण्याचा आग्रह धरला होता

दरम्यान या घटनेनंतर अभिषेकचा मोठा भाऊ म्हणाला की, “तो अभ्यासात हुशार होता आणि त्याने स्वतःच कोटाला कोचिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला होता.”

दरम्यान अभिषेकचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोटा येथे आलेल्या त्याच्या काकांनी सांगितले की, “आम्ही त्याच्याशी दररोज बोलायचो पण त्याने कधीही अभ्यासाबाबत कोणताही ताण असल्याचे कधीही म्हटले नाही. तो नेहमी म्हणायचा की, सर्वकाही ठीक आहे. मी चांगली तयारी करतोय. घटनेच्या आदल्या संध्याकाळी आम्ही त्याच्याशी शेवटचे बोललो होतो.” याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

दरम्यान या प्रकरणावर बोलताना कोटा पोलिसांनी ही घटना अभ्यास आणि परीक्षेच्या तणावातून घडली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : “मी देव नाही… माझ्याकडूनही चुका होतात”, पंतप्रधान मोदी पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच झळकणार

आत्महत्यांच्या घटना कमी झाल्याचा प्रशासनाचा दावा

आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी राजस्थानचे कोटा शहर कोचिंग हब मानले जाते. यासठी दरवर्षी देशभरातून लाखो विद्यार्थ्यी कोटाला येत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत कोटामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याच्या घटना मोठ्या प्रमणात घडल्या आहेत. दरम्यान २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत ५० टक्के घट झाल्याचा दावा कोटा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गेल्या वर्षीच्या तुलनेत, या वर्षी कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. भविष्यातही हा ट्रेंड कायम राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे कोटा जिल्हाधिकारी रवींद्र गोस्वामी यांनी एका मुलाखतीत पीटीआयला सांगितले होते.