तेलंगण भाजपाने रविवारी मुख्यमंत्री के. चंद्शेखर राव यांना लक्ष्य केलं आहे. राव यांनी भाजपावर केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपाने थेट महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा संदर्भ दिलाय. राव यांच्या तेलंगण राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसमध्ये अनेक एकनाथ शिंदे आहेत, असं भाजपाने राव यांच्यावर टीका करताना म्हटलंय. राव यांच्या पक्षामधील अनेक नेते नेतृत्वावर नाराज असल्याचं सूचित करत भाजपाने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.

नक्की वाचा >> २०० आमदार निवडून आणण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी, आपली…”

हैदराबादमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना तेलंगण भाजपाचे अध्यक्ष बंदी संजय यांनी टीआरएसवर टीका केली. “मुख्यमंत्री केसीआर यांना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये काय झालं हे कसं कळलं? भाजपाकडे कोणतेही धोरण नाही असं तुम्ही सांगत असतानाच तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात हे लक्षात ठेवा. भाजपाकडे काही धोरण नसेल तर भाजपा १८ राज्यांमध्ये सत्तेत कशी आहे? मुख्यमंत्र्यांकडून वापरली जाणारी भाषा फारच लज्जास्पद आहे,” असं संजय यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे असा दावाही संजय यांनी केलाय.

“तुम्ही देशाचे नेते आहात का? तुम्ही स्वत:ची पंतप्रधान मोदींसोबत तुलना करता का? पंतप्रधान मोदी दिवसातून १८ तास काम करतात तर तुम्ही (केसीआर) स्वत:च्या फार्महाऊसमधूनही बाहेर पडत नाही. तुम्ही स्वत:ला देशाचे नेते म्हणून घेतल्यापासून लोक तुमच्यावर हसत आहेत,” असा दावा संजय यांनी केलाय. संजय हे करीमनगर येथून भाजपाचे खासदार आहेत.

नक्की वाचा >> नागपूरमधील फडणवीसांच्या बॅनर्सवरुन अमित शाहांचे फोटो गायब; शरद पवारांना विचारलं असता म्हणाले, “त्याच्यात कोणाचा फोटो…”

रविवारी केसीआर यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्यानंतर भाजपाने त्यावर उत्तर दिलं आहे. “नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार जाऊन बिगरभाजपा सरकार सत्तेत यायला हवं,” असं केसीआर यांनी म्हटलंय. “इंदिरा गांधी यांचे आपण आभार मानले पाहिजेत. त्यांनी उघडपणे आणीबाणीची घोषणा केली. त्यांनी थेट घोषणा केली. मात्र आज भारतामध्ये अघोषित आणीबाणी आहे,” असा खोचक टोला केसीआर यांनी लगावला होता.

केसीआर यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन टीका करताना महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदर्भ दिलाय. संजय यांनी, “तुम्ही एकनाथ शिंदेंबद्दल बोलताय, त्याआधी तुम्ही स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्या. मला वाटतं की टीआरएसमध्ये अनेक एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळेच केसीआर यांनी अनेकदा एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला असावा. त्यांच्या स्वत:च्या पक्षामध्ये एकनाथ शिंदेंसारख्या नेत्यांचा प्रभाव वाढत असल्याने त्यांना भीती वाटत असावी,” असा टोला लगावलाय.

नक्की वाचा >> अजित पवारांचं बंड मोडण्यात तुम्हाला यश आलेलं मग उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत?; शरद पवार म्हणाले, “आमच्यात काही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूरादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री लोकांच्या भेटी घेत होते. तर दुसरीकडे केसीआर हे त्यांच्या फार्महाऊसमधूनही बाहेर पडले नाही असा टोलाही संजय यांनी लगावला. “कर्नाटकचे मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाला भेट देत आहेत. तुम्ही स्वत: तुमच्या फार्महाऊसच्याबाहेर तरी पडलात का?”, असा प्रश्न संजय यांनी विचारलाय. “त्यांच्या पक्षामध्ये कोणताही नेता पुढील एकनाथ शिंदे ठरु शकतो. कदाचित त्यांचा मुलगा केटीआर किंवा मुलगी (के कविता) किंवा त्यांचा पुतण्या (हरिस राव) सुद्धा एकनाथ शिंदे बनू शकतात,” असं संजय म्हणाले.