सूरतमध्ये दाखल झालेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याप्रकरणी स्वयंघोषित संत आसाराम बापू यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, या गुजरात पोलीसांच्या मागणीवरील निर्णय गांधीनगरमधील न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. पोलीस आणि बचाव पक्ष या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
गुजरात पोलीसांच्या पथकाने सोमवारी जोधपूर पोलीसंकडून आसाराम बापू यांना ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी सकाळी न्यायालयात आणण्यात आले. सुनावणीवेळी केवळ सरकारी आणि बचाव पक्षाचे वकील आणि संबंधित व्यक्ती यांनाच न्यायालयाच्या आवारात सोडण्यात आले.
सूरतमधील दोन बहिणींपैकी मोठ्या बहिणीने आसाराम बापू आणि त्यांच्या मुलगा नारायण साई यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी आसाराम यांना मुंबईमार्गे अहमदाबादला आणण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2013 रोजी प्रकाशित
आसाराम बापूंविरोधातील रिमांड अर्जावरील निर्णय राखीव
पोलीस आणि बचाव पक्ष या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.

First published on: 15-10-2013 at 04:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual assault case court reserves order on asarams 14 day remand plea