शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संसदेतील मुख्य प्रतोदपदी त्यांची नियुक्त करण्यात आली आहे. याबाबत अमोल कोल्हे यांनी स्वतःहून एक्स पोस्टद्वारे माहिती दिली.

अमोल कोल्हे एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल. परंतु शरद पवार आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले.”

हेही वाचा >> Rajyasabha : मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग; सभापती खंत व्यक्त करीत म्हणाले, “विरोधक सभागृह सोडून नाहीत, मर्यादा…”

“ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार!”, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हेंनी राखलं मैदान

अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून २०२४ ची निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील यांचं आव्हान होतं. या दोन्ही उमेदवारांत अटीतटीची लढत झाली. परंतु, या लढतीत अमोल कोल्हे यांनीच मैदान मारलं. आता शरद पवार गटाचे लोकसभेत ९ खासदार आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांना मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. अमोल कोल्हे यंदा दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच झालेल्या १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवशेनात अमोल कोल्हेंनी मराठी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. “केंद्र सरकारने लवकरात लवकर जाती आधारित जनगणना करावी, तसेच इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट ) खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केली आहे. तसेच त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारलाही लक्ष्य केलं.