भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्यादृष्टीने काश्मीर हा महत्त्वपूर्ण मुद्दा असून त्यावर तोडगा काढायचा असल्यास तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज असल्याचे नवाज शरीफ यांनी सांगितले.  सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्न सोडविण्यासंदर्भात कोणतीही बोलणी सुरू नाहीत. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी एका मध्यस्थाची गरज आहे. भारताला मध्यस्थाचा पर्याय मान्य नसेल तर द्विपक्षीय संवादाचे गाडे अडून राहील, असे शरीफ यांनी म्हटले. नवाज शरीफ हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मी बराक ओबामांना या सगळ्याची कल्पना दिली आहे. परंतु, सध्या यासाठी भारताकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे शरीफ यांनी म्हटले. भारत-पाकिस्तान यांच्यातील काश्मीर प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे, यावर ओबामाही सहमत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharif seeks third party mediation on kashmir issue
First published on: 23-10-2015 at 11:44 IST